मराठमोळ्या प्रार्थना बेहेरेचा ग्लॅमरस अंदाज; डोळ्यातील अदा पाहून तर तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात


मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत काही ना काही पोस्ट करून ती चाहत्यांचे मनोरंजन करते. एवढेच नव्हे, तर तिचे सुंदर व आकर्षक फोटो पोस्ट करून ती अवघ्या चाहत्यावर्गाचे लक्ष आपल्याकडे वेधत असते. चाहतेही तिच्या पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. अभिनेत्रीने नुकतेच शेअर केलेले फोटो देखील नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले असल्याचे दिसत आहे.

प्रार्थनाने तिचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. सोबतच हातात निळी घड्याळ आणि कानामध्ये रिंग्स घातल्या आहेत. या लूकमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमधील तिच्या डोळ्यातील अदा पाहून, तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडाल.

प्रार्थनाने शेअर केलेले हे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, कमेंट करत नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे फोटो शेअर करत प्रार्थना म्हणतेय की, “माझ्याकडे बघताना जेव्हा मी तुला रंगे हात पकडते, जेव्हा मला खूप छान वाटतं!” (see prarthana behere’s glamorous style)

प्रार्थना बेहेरेने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत वैशालीची भूमिका साकारत ती घराघरात पोहचली. पुढे ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

प्रार्थनाने ‘९ एक्स झकास हिरोईन हंट- सीझन १’ चे विजेतेपदही पटकावले होते. यामुळे तिला स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी अभिनित ‘मितवा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त तिने ‘बॉडीगार्ड,’ ‘वजह तुम हो’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. प्रार्थना आता लवकरच ‘छूमंतर’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलनवाज शेख’ कशी बनली संजय दत्तची पत्नी मान्यता? लग्नाआधी करायची ‘सी ग्रेड’ सिनेमात काम

-‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ अरमान मलिकचे २७ व्या वर्षात पदार्पण; ऐका त्याची आतापर्यंतची टॉप ५ गाणी

-जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.