शाहरुखकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी बिग बींकडे नाही? या प्रश्नावर ‘किंग खान’ने दिले मजेशीर प्रत्युत्तर


बॉलिवूड ‘किंग खान’ शाहरुख हा भलेही चित्रपटात त्याच्या रोमँटिक अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. परंतु खऱ्या आयुष्यात त्याचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणदेच विनोदबुद्धी खूप चांगली आहे. आज आपण त्याच्याबाबत 2005 मधील तो किस्सा जाणून घेणार आहोत. जो ऐकून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. (Shahrukh Khan reveals what he has that Amitabh Bachchan doesn’t)

त्यावेळी असे झाले होते की, शाहरुख खान त्याच्या ‘मैं हू ना’‌ आणि अमिताभ बच्चन हे त्याच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आले होते. यावेळी त्या दोघांना अनेक प्रश्न विचारले होते. दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर शाहरुख खानने अत्यंत मजेशीर अंदाजात दिले होते. जे आठवून आजही सर्वांना हसू आवरता येत नाही.

या शोमध्ये करण एक रॅपिड फायर राऊंड घेत असायचा. ज्यामध्ये तो काही प्रश्न विचारायचा आणि समोरच्या व्यक्तीला जास्त विचार न करता पटापट त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागत असायचे. त्यावेळी करणने अमिताभ बच्चन यांना विचारले होते की, “अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्याकडे आहे, पण शाहरुखकडे नाहीये.” त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले होते की, “माझी उंची.” यानंतर त्यांनी सांगितले की, ते शाहरुख खानप्रमाणे एवढ्या पटकन विचार नाही करू शकत.

नंतर जेव्हा शाहरुख खानची वेळ आली, तेव्हा करणने त्याला देखील सेम प्रश्न विचारला. त्याने शाहरुख खानला विचारले की, “तुझ्याकडे असे काय आहे हे अमिताभ बच्चन यांच्याकडे नाहीये.” यावेळी शाहरुख खानने उत्तर दिले की, “उंच बायको.” यावेळी तो हे देखील म्हणाला की, ‘कौन बनेगा करोडपती’ देखील त्याच्याकडे असले असते, तर किती बरं झालं असतं.

अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी लग्न केले आहे. त्यांची उंची 5. फूट 2 इंच आहे, तर शाहरुख खानने गौरीशी लग्न केले आहे. गौरीची उंची 5. फूट 3 इंच आहे. 2019 मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आणि जया बच्चन यांच्या उंचीतील अंतर सांगताना थोडी मज्जामस्ती देखील केली होती. यावेळी या शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाने सांगितले की, तो लवकरच लग्न करणार आहे आणि त्याला त्याच्या उंचीची बायको मिळाली आहे. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “उंचीवर जास्त सल्ले देऊ नको नाहीतर घरी जाऊन लाटण्याचा सामना करावा लागेल.”

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि रोमान्सचा किंग शाहरुख खान हे दोघेही बॉलिवूडचे नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्या दोघांनी ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

या चित्रपटात शाहरुख खान हा अमिताभ बच्चन यांच्या मुलाच्या भूमिकेत होता. सोबतच या चित्रपटात जया बच्चन यांनी ऑनस्क्रीनदेखील अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तसेच ऋतिक रोशन, काजोल आणि करीना कपूर यांनी देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार

-अनिल कपूरच्या ‘वो सात दिन’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; मुख्य अभिनेता म्हणून ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती

-लोकांची मदत करता- करता सोनूने सुरू केले आपले सुपरमार्केट; १० अंड्यांवर मिळतेय ‘ही’ जबरदस्त ऑफर


Leave A Reply

Your email address will not be published.