Thursday, April 25, 2024

रागाच्या भरात ‘किंग खान’नेही केली नाही फोनचीही पर्वा, थेट बाल्कनीतून आपटला खाली

बॉलिवूडचा बादशाह म्हणजे अभिनेता शाहरुख खानला हे यश मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. शाहरुखने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये अढळ स्थान मिळवले आहे. संपूर्ण जगात शाहरुख खानची क्रेझ आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याने आपल्या अभिनयाने नेहमी चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याच्या चित्रपटांना अजूनही तेवढेच प्रेम मिळते. किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम मिळते.

मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याने आपल्या एका ही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. शाहरुख खान शेवटचा ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा या दोघीही दिसल्या होत्या. शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानची एक नवीन जाहिरात आली होती, ज्यात तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर येण्याची हिंट देत होता. या जाहिरातीमध्ये शाहरुख त्याच्या घराच्या बाल्कनीत उभा आहे. तो त्याच्या चाहत्यांना हात हलवून नमस्कार करत होता. याच दरम्यान शाहरुख सोबत अभिनेता राजेश देखील दिसत आहे. ज्यांच्याशी तो डिस्ने प्लस हॉटस्टारबद्दल बोलत आहे.

आता शाहरुख खानची आणखी एक जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही जाहिरात देखील डिस्ने प्लस हॉटस्टारचीच आहे. कदाचित ती फक्त आधीच्या जाहिरातीची लिंक आहे. या जाहिरातीत शाहरुख खान राजेश जैस सोबत दिसत आहे. यामध्ये राजेश शाहरुखला म्हणत आहे की, डिस्ने प्लस हॉटस्टारकडून एक संदेश आला आहे, मात्र शाहरुखला वाटत की हा संदेश त्याच्यासाठी आला आहे. तेव्हा शाहरुखने राजेशच्या हातातून फोन बाल्कनीतून खाली फेकतो.

पहिल्या जाहिरातीत, शाहरुख राजेशला म्हणाला की, “बघितलास का, इतके चाहते कधीतरी कुणाच्या घराबाहेर येतात का?” यावर तो व्यक्ती म्हणाला की, “नाही सर, मी कधीच नाही पाहिले. मात्र पुढे काही सांगू शकत नाही.” जेव्हा शाहरुख त्याला याचा अर्थ विचारतो, तेव्हा तो व्यक्ती म्हणते की, “बाकीच्या स्टार्सचे शो आणि चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत आहेत.” पुढे शाहरुख विचारतो की, “इथे कोण कोणते कलाकार आहेत.” मग तो व्यक्ती म्हणतो की, “तिथे अक्षय, सैफ, अजय आणि संजय दत्त आहेत. मात्र तू नाहीस.” मग त्यानंतर शाहरुख विचारात पडतो.

यावरून शाहरुख सध्या डिस्ने प्लस हॉटस्टारवर त्याचा कोणता नवीन प्रोजेक्ट प्रदर्शित करणार आहे की नाही याचा अंदाज चाहते लावत आहेत. या कंपनीचे नाव ‘सिवाय SRK’ असे ठेवले आहे. याशिवाय, त्याचे चाहते शाहरुखला त्याच्या नवीन प्रोजेक्ट लवकरच घोषणा करायला सांगत आहेत. असे म्हटले जात आहे की, शाहरुख FOMO झाला आहे, म्हणजेच तो इतरांपासून दूर असल्यामुळे नाराज आहे. आता हे पाहावे लागेल की, शाहरुख पुढे काय घोषणा करतो की नाही ते?

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा