शनमुखप्रियाने पहिल्यांदाच ‘इंडियन आयडल’च्या मंचावर गायले शास्त्रीय गीत, परीक्षकांनी केले भरभरून कौतुक


टेलिव्हिजनवरील सोनी या चॅनलवर दाखवला जाणारा ‘इंडियन आयडल 12’ हा शो खूपच लोकप्रिय आहे. या शोमध्ये स्पर्धकांची गाणी सर्वांना खूप आवडतात. येणाऱ्या विकेंडमध्ये या शोमध्ये ‘फादर्स डे’ साजरा केला जाणार आहे. एपिसोडची थीम देखील ‘फादर्स डे’वर आधारित असणार आहे. यामध्ये स्पर्धक त्यांची गाणी त्यांच्या वडिलांना समर्पित करणार आहे. यासोबतच स्पर्धक आणि त्यांच्या वडिलांमधील काही भावुक क्षण दाखवले जाणार आहेत.

नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक यांच्या उपस्थितीत तसेच आदित्य नारायण याने होस्ट केलेल्या या शोमध्ये या आठवड्यात चांगलीच धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. या एपिसोडमध्ये गायिका स्पर्धक शनमुखप्रिया ही , ‘भरे नैना’ हे गाणे गाणार आहे. या नंतर सगळे परीक्षक उभे राहून तिच्या गाण्याचे कौतुक करतात.

त्यावेळी हिमेश रेशमियाने तिचे कौतुक करताना म्हंटले की,. “तू खूप सुंदर पद्धतीने हे गाणे गायले आहे. मी पूर्णपणे तुझ्या गाण्याच्या प्रेमात बुडालो होतो. आपल्या सगळ्यांना हे लक्षात ठेवले पाहिजे की, तू पहिल्यांदा या मंचावर शास्त्रीय गीत गायले आहे. इतक्या सुंदर पद्धतीने गायल्यामुळे मी तुला सलाम करतो.”

यावेळी आदित्य नारायणने शनमुखप्रियाचे वडील आणि तीला मंचावर बोलावून हिमेश रेशमियाच्या ट्रेंडिंग ‘सुरुर तेरा’ गाण्यावर डान्स करायला सांगितले. यावेळी शनमुखप्रियाने तिचा आनंद व्यक्त करताना म्हंटले की, “हे माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. इंडस्ट्रीमधील सगळ्या दिग्गज व्यक्तीने केलेले हे कौतुक एक सन्मानाची गोष्ट आहे. यात सोन्याहून पिवळी गोष्ट म्हणजे हा क्षण मला माझ्या वडीलांसोबत शेअर करत आला. मला खूप आनंद होत आहे.”

गेल्या काही दिवसांपासून शनमुखप्रिया सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या वेळी आदित्य नारायणने तिला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यावेळी तिने म्हंटले होते की, “तिला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. यानंतर तिने सांगितले की, मायकल जॅक्सन सारख्या कलाकाराला देखील या गोष्टींचा सामना करायला लागला होता. यामुळे या गोष्टी खूप नॉर्मल आहे.”

सगळ्यांना आता या एपिसोडची उत्सुकता लागली आहे. हा एपिसोड नक्की कसा असणार आहे, स्पर्धक कशी गाणी गाणार आहे याची सर्वांना आस लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता करोडोंची कमाई करणाऱ्या विद्या बालनला पहिल्या जाहिरातीसाठी मिळाले होते केवळ ‘इतके’ रुपये

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट


Leave A Reply

Your email address will not be published.