Thursday, July 18, 2024

सोनाक्षी-झहीरच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देव त्यांची जोडी…’

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केले. सोनाक्षी आणि झहीर यांनी नोंदणीकृत विवाह केला आहे. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षीचे कुटुंबीय आणि झहीरचे कुटुंबीय तेथे उपस्थित होते. याशिवाय काही जवळचे लोक देखील उपस्थित होते.

सोनाक्षी आणि झहीरच्या नोंदणीकृत विवाहादरम्यान शत्रुघ्न सिन्हा आनंदी दिसत होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. मला कसे वाटते ते सांगितले आणि नवीन जोडप्याला कायम सोबत राहण्याचा आशीर्वादही दिला.

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि आसनसोलचे टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची एकुलती एक मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने आज लग्नगाठ बांधली. प्रसारमाध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘प्रत्येक वडील या क्षणाची वाट पाहत असतात जेव्हा त्यांची मुलगी त्यांच्या आवडीच्या व्यक्तीकडे सोपवली जाईल. माझी मुलगी झहीरसोबत सर्वात आनंदी आहे, ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि देव त्यांच्या जोडप्याला सुरक्षित ठेवो.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची 23 जून रोजी संध्याकाळी नोंदणी झाली होती. सोनाक्षी-झहीर यांनी सिव्हिल मॅरेज म्हणजेच १९५४ च्या स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत, मुंबईतील वांद्रे येथे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांमध्ये त्यांच्या लग्नाची नोंदणी केली आहे. आता मुंबईत एका ग्रॅण्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे ज्यात बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी; वाचा संपूर्ण प्रकरण
‘कल्की 2898 एडी’बाबत तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय, पहिला शो होणार इतक्या वाजता सुरु

हे देखील वाचा