Thursday, April 25, 2024

काय सांगता! बॉलिवूडमध्ये राहूनही अभिनेत्री शेफाली शाहला सासरी करावा लागला लिंगभेदाचा सामना

शेफाली शाह या बॉलिवूडमधील अतिशय प्रभावी आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या कॅरेक्टर भूमिकांनी चित्रपटांमधून त्यांनी त्यांची प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पडली आहे. शेफाली यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले मात्र यातही त्यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले. लवकरच शेफाली विद्या बालनसोबत ‘जलसा’मध्ये दिसणार आहे. मात्र नुकताच तिने तिच्या घरातील लिंगभेदावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने यावर भाष्य करत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या.

शेफाली या मुलाखतीमध्ये म्हणाली की, “मी देखील रूढीवादी विचारांची शिकार झाली आहे. खासकरून माझ्या सासरी मी माझ्यासोबत असा भेदभाव झाला. मी नेहमीच माझे मत जाहीर करत असते. मात्र जेव्हा मी चर्चा करते तेव्हा मी फक्त माझ्या भावनांना समजण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा मी मोठी होत होती, तेव्हा मी माझ्या आईच्या किंवा आईवडिलांच्या बोलण्याचे पालन केले. मी कधीही त्यांच्या शिकवणीवर किंवा त्यांच्या बोलण्यावर प्रश्न उपस्थित केले नाही. मी आज याच गोष्टीसाठी आजच्या तरुणांवर प्रभावित आहे, जे प्रत्येक मुद्द्यवर त्यांचे मत स्पष्टपणे मांडतात.”

पुढे शेफाली यांनी सांगितले की, “मी माझ्या सासरी लिंगभेदाचा सामना केला आहे. हो मला माहित आहे की, माझे सासू सासरे दुसऱ्या पिढीतील आहे. मात्र तरीही, मला आठवते जेव्हा विपुल शूटिंगसाठी जातात तेव्हा कोणीही प्रश्न विचारत नाही, पण जेव्हा मी सतत शूटिंग करते तेव्हा मला सर्वच लोकं प्रश्न विचारतात. म्हणतात, “परत तुला शूटिंगला जायचे आहे?” यावर माझी प्रतिक्रिया असते, ‘खरंच? मला हा प्रश्न विचारला जात आहे? कधी कधी तर विचारतात, ‘तू इतका वेळ शूटिंग करते?’ मी तेव्हा विचार करते की, हा प्रश्न तुम्ही कधी तुमच्या मुलाला का विचारत नाही?”

पुढे ती म्हणाली, “मी माझ्या घराची योग्य ती देखभाल करू शकते. जेवण बनवणे, स्वछता करणे, भांडे घासणे, झाडू मारणे, फरशी पुसणे, कपडे धुणे आदी सर्व घरातली कामं मी करू शकते. मला आठवते की, एकदा विपुल भांडे घासत होते तेव्हा माझी सासू त्यांच्या मागे उभी होती. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘एवढा मोठा दिग्दर्शक भांडे घासत आहे.’ मला हे ऐकून खूप वाईट वाटले. तेव्हा मी विचार केला, अभिनेत्री भांडे घासते ते काही नाही का?’ तो मोठा दिग्दर्शक आहे हे नक्की मात्र घरात याचा काही संबंध नाही.” शेफाली शाह सध्या करिअरच्या पीकवर आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये कामं केले असून, दिल्ली क्राईम सारख्या हिट वेबसिरीज देखील केल्या आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा