Sunday, May 19, 2024

‘खतरों के खिलाडी 13’च्या सेटवर शिव ठाकरेला झाली दुखापत, बोटाला द्यावे लागले ‘इकते’ टाके

चाहते स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 13‘ची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. हा शो रोहित शेट्टीने होस्ट केला आहे. त्याचे शोचे शूटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. सर्व स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी जाेरदार मेहनत घेताना दिसत आहेत. या दरम्यान अनेकांना स्टंट करताना मोठी दुखापत झाली आहे. रोहित रॉय, ऐश्वर्या शर्मा, नायरा बॅनर्जी आणि अंजुम फकीह यांच्यानंतर आता या यादीत शिव ठाकरेच्या नावाचाही समावेश झाला आहे. शिव ठाकरेला नेमके झाले तरी काय? चला, जाणून घेऊया…

शिव ठाकरेंचा (Shiv Thackeray) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शिवाने ब्लॅक शर्ट आणि व्हाइट जीन्ससह तपकिरी रंगाचे विंटर फर जॅकेट घातलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो त्याच्या उजव्या हाताची अनामिका दाखवत आहे. जीला स्टंट करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या बोटाला टाके पडले. शिवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओ पाहुन चाहचे खूप साऱ्या कमेंट करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी अर्चना गौतम हिला देखील दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. अर्चना बिग बॉस 16 पासून खूप लोकप्रिय झाली आहे. या शोमुळे तिला रोहित शेट्टीचा स्टंट आधारित शो मिळाला आहे. या सगळ्यात ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात भांडण झाल्याच्या बातम्याही अलीकडे व्हायरल होत होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

सर्व स्टार्स दाक्षिण आफ्रिकेतून रंजक फाेटाे सोशल मीडियावर शेअर करत आहे. ज्यावरून अंदाज लावला जात आहे की, ते सर्व त्यांचा वेळ खूप चांगल्यापद्धतीने घालवत आहे. मात्र, यासाेबतच शाेमध्ये स्पर्धक जखमी हाेताना देखील दिसत आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या सीजनमध्ये ट्राॅफी काेणता स्पर्धक जिंकेल याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. हा शो 15 जुलैपासून रात्री 9 वाजता कलर्सवर प्रसारित होणार आहे. (Shiv Thackeray was injured on the sets of ‘Khatron Ke Khiladi 13’)

अधिक वाचा- 
– पहिला सिनेमा मिळवण्यासाठी कार्तिक आर्यनने पाहिली तीन वर्ष वाट, मोठ्या संघर्षाने मिळवले यश
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर सोनाली कुलकर्णींने मांडले मत; पोस्ट शेअर करत म्हणाले, “पाऊस आणि…”

हे देखील वाचा