Sunday, June 4, 2023

धक्कादायक! टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, घातपाताची वर्तवली जातेय शक्यता

मागील काही वर्षांपासून प्रत्येक व्यक्तीमध्ये लपलेल्या कलाकाराला व्यासपीठ देण्यासाठी ‘टिक टॉक, ‘शेअर चॅट’, ‘इंस्टाग्राम’ या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. काही देशांमध्ये हे माध्यम बंद असले, तरीही मोठ मोठ्या देशांमध्ये या माध्यमाचा जबरदस्त वापर केला जातो. टिक टॉक, इंस्टाग्राम यामुळे अनेक व्यक्ती स्टार बनले. अशात टिक टॉकवरील प्रसिद्ध संतोष मुंडेबद्दल दु:खद बातमी समोर येत आहे. टिक टॉक स्टार संताेष मुंडे यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

अचानक विद्युत पुरवठा सुरु झाल्यानं जागीच मृत्यू
टिक टॉक स्टार संताेष मुंडे (Santosh Munde’s ) यांचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातंय. स्टार संताेशसाेबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी म्हणजेच मंगळवारी (13 डिसेंबर)ला संताेष आणि बाबुराव मुंडे डीपीचा फ्यूज बदल्यासाठी गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरु झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.

संताेष मुंडे यांचा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा
संताेष मुंडे अस्सल ग्रामीन शैलीमध्ये मजेशीर व्हिडिओ बनवायचे. त्याचे बहुधा व्हिडिओ शेतात तयार केलेले राहायचे. अगदी कमी काळामध्ये संतोष याने टिक टॉकच्या माध्यमातून एक खास ओळख तयार केली हाेती. त्यांचा साेशल मीडियावर लाखांच्या संख्येत चाहतावर्ग हाेता. आता त्यांच्या निधनाने चाहत्यांपासून ते मित्रांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांनी त्याच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ही घटना घडली. ग्रामस्थांमध्ये हा अपघात नसून घातपात असल्याची एकच चर्चा सुरू आहे. संतोषच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी भोगलवाडीकडे धाव घेतली असून पाेलिस घटनेचा तपास करत आहेत.(Shocking! Tik Tok star Santosh Munde’s pass away )

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कमल हसनने बॉलिवूडला दिला माेलाचा सल्ला; म्हणाले, ‘इंग्रजी आधी बंगाली आणि हिंदी…’

उर्मिलालाचा साडी लूक चर्चेत, जिंकली चाहत्यांची मने!

हे देखील वाचा