एकदम कडक! ‘प्रीता’च्या डान्सचा सोशल मीडियावर राडा; सोबत दिसली टीव्हीवरील ‘पार्वती’

Shraddha Arya share sassy dance video with heena Parmar on social media


टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्या ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत ‘प्रीता’ हे पात्र निभावणारी श्रद्धा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिच्या बोल्ड अंदाजाने ती चाहत्यांना नेहमीच हैराण करत असते. तिचा सोशल मीडियावर देखील खूप जास्त फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिचे फोटो व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. श्रद्धाचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर राडा करत आहे. शेअर करता क्षणीच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

श्रद्धाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत टीव्हीवरील पार्वतीचे पात्र निभावणारी अभिनेत्री आणि तिची खास मैत्रीण हिना परमार दिसत आहे. टेलिव्हिजनवर एका साध्या- भोळ्या सुनेचे पात्र निभावणाऱ्या हिनाला या डान्स स्टेप्स करताना पाहून कोणीही हैराण होईल. या व्हिडिओमध्ये हिना आणि श्रद्धा ‘रनअवे’वर डान्स करत पोझ देत आहेत. या व्हिडिओमध्ये श्रद्धाने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स ब्रा घातली आहे, तर हिना परमार देखील ब्लॅक शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स ब्रा घालून तिची बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून श्रद्धाने लिहिले आहे की, “माझी योग गुरू आणि बेस्टफ्रेंड हिना परमारसोबत डान्स स्टाईलमध्ये स्ट्रेचिंग.” हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओचे कौतुक करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओला २ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

श्रद्धा आर्या ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीची अभिनेत्री आहे. तिने ‘मैं लक्ष्मी तेरे आंगण की’, ‘तुम्हारी पाखी’ आणि ‘ड्रीमगर्ल’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून तिने तिचे नाव कमावले आहे.

हिना परमारने देखील ‘जोधा अकबर’, ‘मै भी अर्धांगिनी’, ‘हार जीत’, ‘पुनर्विवाह’, ‘विघ्नहर्ता गणेश’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मैं लक्ष्मी तेरे आंगण की’ या मालिकेत श्रद्धा आणि हिनाने एकत्र काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.