हॅपी बर्थडे श्रेयस: बघताच तिच्या प्रेमात पडला… चार दिवसात प्रपोज केलं आणि नंतर… अशी आहे श्रेयस तळपदेची लव्ह स्टोरी

हॅपी बर्थडे श्रेयस: बघताच तिच्या प्रेमात पडला... चार दिवसात प्रपोज केलं आणि नंतर... अशी आहे श्रेयस तळपदेची लव्ह स्टोरी


आज मराठी आणि हिंदी अभिनेता श्रेयश तळपदेचा वाढदिवस. २७ जानेवारी १९७६ ला श्रेयशचा मुंबईत जन्म झाला. श्रेयसने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. श्रेयसने अनेक विनोदी हिंदी आणि मराठी सिनेमे केले. त्या सिनेमातील त्याचे काम पाहून प्रेक्षकांसोबतच समीक्षकांही श्रेयसच्या अभिनयाचे कौतुक केले.

हिंदीमध्ये त्याने ओम शांती ओम, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल ३, हाऊसफुल २, गोलमाल अगेन, डोर अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा हिंदी सिनेमांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणजे २००५ साली आलेला इक्बाल. या सिनेमातून त्याने प्रचंड वाहवा मिळवली.

आज श्रेयश त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रेयश आणि त्याचे सिनेमे आपल्या सर्वानाच माहित आहे. मात्र आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याचे वैयक्तिक जीवन जाणून घेऊया. हिंदी मधील जेष्ठ अभिनेत्री जयश्री टी आणि मीना टी ह्या श्रेयसच्या आत्या आहेत. श्रेयसची अगदी चित्रपटातल्या कथेलाही मागे टाकेल अशी मस्त लव्हस्टोरी आहे.

श्रेयसला २००० साली मुंबईच्या एका कॉलेजमध्ये कॉलेज फेस्टसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्या फेस्टिव्हलची सेक्रेटरी दिप्ती होती.श्रेयसने तिला पाहिले आणि त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर पुढच्या चारच दिवसात त्याने तिला प्रपोज केले. चार वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केले आणि २००४ साली त्यानी लग्न केले.

लग्नाच्या १४ वर्षांनी मे २०१८ ला त्यांना सरोगसीचा माध्यमातून मुलगी झाली. दीप्ती श्रेयस सोबत त्याच्या प्रत्येक निर्णयात असते. तिने त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणार साथ दिली. तो सुद्धा त्याच्या यशाचे श्रेय डीपीलाच देताना दिसतो.

श्रेयसने त्याच्या अभिनयाची सुरुवात १९९८ साली झी टीव्हीच्या ‘वो’ मालिकेतून केली. त्यानंतर त्याने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केले. २००५ साली त्याला नागेश कुन्नूर यांच्या ‘इक्बाल’ ह्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्याचा हा सिनेमा आणि तो स्वतः खूप लोकप्रिय झाले.

श्रेयसने अनेक मराठी सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. त्यात सनई चौघडे, आईशप्पथ, पछाडलेला, सावरखेड एक गाव, बाजी, पोस्टर बॉइज अशा हिट सिनेमांचा समावेश आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.