Friday, February 3, 2023

‘लाज वगैरे वाटती का नाही?’, बोल्ड ड्रेस घालून आई श्वेतासोबत डान्स केल्यामुळे, पलक झाली ट्रोल

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari)सध्या तिच्या ‘बिजली बिजली’ या गाण्यासाठी चर्चेत आहे. अलीकडेच पलक आई श्वेता तिवारीसोबत ‘बिजली बिजली’ गाण्याच्या सक्सेस पार्टीत पोहोचली होती. या पार्टीत श्वेता कॅज्युअल लूकमध्ये दिसली, तर सर्वांच्या नजरा पलकच्या ड्रेसवर खिळल्या होत्या. यावेळी पलक तिवारीच्या लूकची लोकांनी जोरदार प्रशंसा झाली. त्याचवेळी काही युजर्सला पलक तिवारीचा ड्रेस आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

आईसोबत केला बोल्ड ड्रेसमध्ये डान्स
या इव्हेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पलक तिवारी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या पार्टीत तिने आई श्वेतासोबत ‘बिजली बिजली’ गाण्यावर डान्सही केला. यादरम्यान पलकने असा बिकिनी स्टाइल टॉप घातला होता, ज्यातून तिची ब्रा दिसत होती. तिच्या याच आऊटफिटमुळे आता तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहेत. (shweta tiwari daughter palak gets brutally trolled for dancing in bold dress)

ड्रेसमुळे झाली ट्रोल
एका युजरने लिहिले, “बकवास ड्रेस.” आणखी एकाने लिहिले, “काही लाज वाटतेय की नाही.” दुसऱ्याने लिहिले, “अरे तुझा नाही तर निदान आईचा तरी आदर कर.” अशाप्रकारे पलकला या ड्रेसमुळे ट्रोल केले जात आहे. याउलट काही चाहत्यांनी पलक तिवारी आणि श्वेताच्या बाँडिंगचे कौतुकही केले आहे.

तरुणांमध्ये लोकप्रिय झालंय गाणं
पलक तिवारी आणि हार्डी संधू यांचे ‘बिजली बिजली’ नुकतेच रिलीझ झाले आहे, ज्याला खूप पसंत केले जात आहे. चाहत्यांशिवाय अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर डान्स करतानाचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी पलक तिवारीने तिची आई श्वेतासोबत याच गाण्यावर डान्स केला होता, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. तिचे ‘बिजली बिजली’ हे गाणे गायक आणि संगीतकार बी प्राकने लिहिले आहे. या गाण्याला हार्डी संधूने आवाज दिला आहे. व्हिडिओ सॉन्गमध्ये हार्डी पलकसोबत रोमान्स करताना आणि जबरदस्त डान्स करताना दिसला. हे गाणे काही अल्पावधीतच तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा