Thursday, March 28, 2024

‘झिम्मा’ चित्रपट पाहून पुण्यातील आजींना आठवले त्यांचे तारुण्य, आजींनी केला धमाकेदार डान्स

महाराष्ट्रात चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर ‘झिम्मा’ हा पहिलाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात नुसता धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र या चित्रपटाची चर्चा चालु आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून, हा चित्रपट अजूनही हाऊसफुल्ल ही आहे. नुकतेच ‘झिम्मा’चा टीमने त्यांची सक्सेस पार्टी साजरी केली. कलाकार त्यांना जमेल तसे कोरोनाचे सर्व नियम पळत या चित्रपटाचे प्रमोशन देखील करत आहे. तिसरा आठवडा चालू झाला आहे, तरी देखील हा चित्रपट सर्वत्र हाऊसफुल्ल आहे. अशातच या चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पुण्यातील एका चित्रपटगृहाला भेट दिली आणि पुण्यातील बायकांचा चित्रपट पाहून मिळालेला आनंद आणि उत्साह कॅमेरामध्ये टिपला आहे.

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत हेमंत ढोमे दिसत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील एका चित्रपटगृहातील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजी झिम्मा चित्रपटाच्या शीर्षक गीतावर धमाकेदार डान्स करताना दिसत असून, तसेच त्यांनी फुगडी देखील खेळली. या व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की, पुण्यातील बायका कमाल आहेत. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “पुण्यातील बायका थकतचं नाही.” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.(Siddharth chandekar share jhimma movie pramotion video on social media)

‘झिम्मा’चे पहिल्या आठवड्यात ३२५ शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ७०० पेक्षा जास्त म्हणजेच दुप्पटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे ५० टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटाने ५.८३ कोटींचा टप्पा पार केला. लॉकडाऊननंतर सुपरहिट ठरलेला ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिकनी केले असून हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अशोकमामांसोबत ‘गंमत जंमत’ चित्रपटात झळकलेल्या ‘चारुशीला साबळे’ नंतर इंडस्ट्रीतून अचानक झाल्या गायब, आज आहे…

-तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा