Tuesday, January 31, 2023

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर कपिलने 3 महिने उचलला नव्हता ‘पत्नी’चा पदर, कॉमेडियनचा मोठा खुलासा

प्रेक्षकांना खदखदून हसायला भाग पाडणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो‘ होय. या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मूड कितीही खराब असला, तरीही हा कार्यक्रम पाहिल्यानंतर चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. या कार्यक्रमाचा होस्ट कपिल शर्मा हा प्रेक्षकांना हसवण्यास भाग पाडतो. या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्याला मोठमोठे कलाकार आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात. यादरम्यान ते कपिलसोबत मजा-मस्तीही करतात. यावेळी कार्यक्रमात अभिनेत्री काजोल हिने एन्ट्री घेतली. ती तिचा ‘सलाम वेंकी’ हा सिनेमा प्रमोट करण्यासाठी पोहोचली होती. मात्र, यादरम्यान कपिलने त्याच्या पत्नीला जे काही म्हटले, त्याने हसू फुटल्याशिवाय राहणार नाही.

कपिलची ‘पत्नी’सोबत आंबड-गोड भांडणे
‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) ही कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसते. कपिल त्याच्या या कार्यक्रमात ऑनस्क्रीन पत्नीची खूप थट्टा उडवतो. ‘पत्नी’सोबत कपिलची आंबट-गोड भांडणे चाहत्यांना खूप आवडतात.

अशात नवीन एपिसोडमध्ये कपिलची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्ती त्याला हसत हसत म्हणते की, “हाय हसबंड.” मात्र, यावर कपिल हैराण होऊन उत्तर देतो की, “दीदी तुम्ही?” हे ऐकून कपिलची ऑनस्क्रीन पत्नी चिडते आणि ती काजोलला म्हणते की, “हा व्यक्ती इतका आळशी आहे की, तुम्हाला विश्वास बसणार नाही. लग्नाच्या तीन महिन्यांपर्यंत या माणसाने माझा पदरही उचलला नव्हता.”

सुमोनाचे हे वक्तव्य ऐकून कपिलही शांत बसत नाही. तो कॉमेडी पंच मारत म्हणतो की, “जर तुम्हाला माहिती आहे की, आतमध्ये कोणती वस्तू आहे, त्यामुळे मी पदर उचललाच नाही. मी माझा पदर ओढूनच झोपून गेलो.” कपिलचे हे वक्तव्य ऐकून सर्वजण हसू लागतात.

काजोल दिसणार ‘सलाम वेंकी’मध्ये
दुसरीकडे, काजोलबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ती तिच्या ‘सलाम वेंकी’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
भोजपुरीची स्टार अभिनेत्री बनली मिया खलिफा, लेटेस्ट व्हिडिओवरून अक्षरा चाहत्यांकडून झाली ट्रोल
माधुरीने केला पाकिस्तानी मुलीचा डान्स कॉपी; भडकलेले नेटकरी म्हणाले, ‘तुझ्यापेक्षा तीच भारी’

हे देखील वाचा