Wednesday, December 6, 2023

देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, शासनाने ‘या’ कारणामुळे थेट सूट घालण्यावर आणलेली बंदी?

भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याच्या तेजाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते देव आनंद यांची शनिवारी (दि. 03 डिसेंबर) पुण्यतिथी असते. त्यांनी 60च्या दशकामध्ये सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या दमदार अभिनयासह ते एक उत्तम दिग्दर्शक देखील होते. सुख, प्रेम, रोमान्स असे प्रेमावर आधारित चित्रपट करण्यात त्यांचा हातखंडा होता. तसेच त्याकाळी सर्वात सुंदर अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

देव आनंद (Dev Anand) यांचा जन्म 26 सप्टेंबर, 1923 रोजी पंजाबच्या शंकरगढ येथे झाला होता. तेथीलच डलहौसीच्या सेक्रेड हार्ट स्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर ते लाहोरला आले. देव यांनी बीएमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. ब्रिटिश भारतातील लाहोरच्या शासकीय महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी साहित्यातील पदवी देखील मिळवली.

त्यांचं खरं नाव देव आनंद नसून, धर्मदेव पिशोरिमल आनंद हे आहे. परंतु सिनेसृष्टीमध्ये त्यांना सर्वजण देव आनंद म्हणूनच ओळखतात. तसेच, घरामध्ये सर्वांचे लाडके असल्याने त्यांना लहानपणापसूनच घरी चिरू नावाने संबोधले जात होते.

देव यांना पाहून घरावरून उडी मारत होत्या सुंदर तरुणी
दिग्गज अभिनेता देव आनंद हे अतिशय सुंदर दिसायचे. त्या काळी अनेक तरुणींची मने त्यांनी चोरली होती. प्रेमाची परिभाषा सांगणारा त्यांचा चित्रपटातील अनुभव इतका दांडगा होता की, अनेक तरुणी त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. अनेक मुली त्यांना काळ्या सुटा बुटात पाहण्यासाठी घराच्या छतावरून उडी घ्यायच्या. त्यामुळे देव यांच्या सूट घालण्यावर शासनाने बंदी आणली होती. देव आनंद सुंदर तर दिसायचे, परंतु छतावरून उडी घेण्याच्या अशा त्या काळी अनेक अफवा पसरल्या होत्या.

अवघे 85 रुपये होते पहिले वेतन
देव आनंद यांनी खूप शिक्षण घेतले होते. कलेप्रमाणेच त्यांच्याकडे अफाट ज्ञान देखील होते. त्यामुळे सुरुवातीला मुंबईमध्ये त्यांनी नोकरीचा मार्ग निवडला. त्यांनी पहिली नोकरी ही एका कंपनीमध्ये केली होती. तिथे ते अकाऊंटंट म्हणून काम करायचे. त्यासाठी त्यांना फक्त 85 रुपये पगार देण्यात येत होता.

अशी झाली चित्रपटांची सुरुवात
साल 1946मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘हम एक है’ मधून त्यांनी सिनेसृष्टीत पहिले पाऊल टाकले. एका श्वासात ते मोठमोठे डायलॉग अगदी सहज बोलायचे. त्यांचे पाठांतर आणि डायलॉग बोलण्याची पद्धत रसिक प्रेक्षकांचे हृदय चोरायची. डायलॉग बोलताना ते नेहमी त्यांच्या अनोख्या अंदाजमध्ये एका दिशेला झुकायचे आणि मग डायलॉग बोलायचे. त्यांच्या या अनोख्या अंदाजाने देखील प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा बनवली होती. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ‘जिद्दी’, ‘विद्या’, ‘हम भी इन्सान है’, ‘गाईड’, ‘जीत’, ‘मधुबाला’ असे अनेक हिट चित्रपट केले.

या अभिनेत्रीमध्ये अडकला होता जीव
सुरांची राणी सुरैया यांच्यावर देव आनंद यांचा जीव अडकला होता. ‘विद्या’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्या पाण्यात बुडत असताना देव यांनी त्यांचे प्राण वाचवले आणि त्यांच्या प्रेमात पडले. देव यांनी त्या काळी 3000 रुपयांची हिऱ्याची अंगठी देऊन अभिनेत्रीला प्रपोज देखील केले होते. परंतु देव हिंदू आणि सुरैया मुसलमान असल्याने या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला.

लंच ब्रेकमध्येच केलं लग्न
‘टॅक्सी ड्रायव्हर’ या चित्रपटामध्ये देव कल्पना कार्तिकी यांच्या प्रेमात पडले. पहिल्या प्रेमात आलेल्या अनुभवामुळे त्यांनी या चित्रपटावेळी लंच ब्रेकमध्येच लग्न उरकून घेतले. कल्पना यांनी देव आनंद यांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. त्या शेवटपर्यंत देव यांच्यासह पत्नी म्हणून राहिल्या. साल 2011 साली त्यांची प्राणज्योत मालवली. आज देव आनंद या जगात नाहीत, परंतु त्यांच्या चित्रपटांमुळे ते आजही लोकांच्या मनामध्ये जिवंतच आहेत. (Special Story About Dev Anand know interesting things related to actor marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, शासनाने ‘या’ कारणामुळे थेट सूट घालण्यावर आणलेली बंदी?
देव आनंद अन् सुरैया यांच्या प्रेमात मामाने घातलेला रोडा, अधुऱ्या लव्हस्टोरीचा ‘असा’ झाला वेदनादायक अंत

हे देखील वाचा