पवनचे भोजपुरी नव्हे, तर ‘हे’ हिंदी गाणे करतंय धमाल, मिळालेत ३ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज


भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग आजकाल आपल्या गाण्यांमुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व निर्माण करत आहे. त्याची अनेक सुपरहिट गाणी एकापाठोपाठ प्रदर्शित झाली आहेत. ही गाणी केवळ भोजपुरी इंडस्ट्रीमध्येच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही खूप ऐकली जातात. त्याचबरोबर पवन सिंग आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांना प्रभावित करत नाही, तर तो आपल्या आवाजाने लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतो.

पवन सिंग हा असा स्टार आहे, जो त्याच्या अंदाजाने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. मग तो अभिनय असो वा डान्स, संगीत गाणे असो किंवा सहकलाकारांसोबत रोमान्स असो. पवन सिंग भोजपुरी गाण्यांमधून खूप धमाल करतो, पण त्याच्या हिंदी गाण्यांनाही खूप  पसंती मिळते. आजकाल ‘लॉलीपॉप लागेलू’ फेम गायकाचे ‘कोई बात नहीं ओ बेवफा’ हे हिंदी गाणे अजूनही युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे पवनने प्रियांका सिंगसोबत गायले आहे.

या गाण्यात पवन एका अविश्वासू गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडताना दिसत आहे. संपूर्ण गाण्यात त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसून येत आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये पवनची गर्लफ्रेंड बनलेली भोजपुरी अभिनेत्री मधू शर्माला प्रेमाची भीक मागत आहे आणि वारंवार खरे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. गाण्यात पवनची गर्लफ्रेंड त्याला ॲटिट्यूड दाखवत म्हणते की, “माझ्यासमोर तुझी काहीच लायकी नाही.” तेव्हा पवन म्हणतो की, “असे का? काही हरकत नाही.”

पवन सिंग आणि प्रियांका सिंग यांचे सुपरहिट हिंदी गाणे परदेशी भूमीवर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे जीएमजी- ग्लोबल म्युझिक जंक्शन भोजपुरीने जून २०२० मध्ये त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला आतापर्यंत ३ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यानंतर, भोजपुरी हिट मशीनने १९ नोव्हेंबर, २०२१ रोजी हे गाणे पुन्हा एकदा प्रदर्शित केले आहे. ज्याला अवघ्या ५ तासांत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे बोल आझाद सिंग यांनी लिहिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे


Latest Post

error: Content is protected !!