Sunday, January 26, 2025
Home अन्य राडाच ना! रेणुका पंवारचं ‘जन्नत के तुकडे’ गाणं युट्यूबवर होतंय भन्नाट व्हायरल, मिळवले ‘इतके’ व्ह्यूज

राडाच ना! रेणुका पंवारचं ‘जन्नत के तुकडे’ गाणं युट्यूबवर होतंय भन्नाट व्हायरल, मिळवले ‘इतके’ व्ह्यूज

गेल्या काही दिवसांपासून हरियाणवी गाण्यांची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. वाढदिवसाची पार्टी असो किंवा लग्नासारखा मोठा कार्यक्रम, लेटेस्ट हरियाणवी गाण्यांवर डान्स केला नाही, तर मजा अधुरी राहते. यावेळी ‘५२ गज का दामन’ या गाण्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेली सुप्रसिद्ध गायिका रेणुका पंवार (Renuka panwar) हिची गाणी धुमाकूळ घालत आहेत. तिची काही गाणी अजूनही ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहेत. रेणुकाचे ‘जन्नत का तुकडा’ (Jannat Ka Tukda) हे गाणे सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या गाण्याने सर्वत्र धमाल केली आहे. या गाण्यावर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

‘जन्नत के टुकडे’ या गाण्याला युट्यूबवर ३ कोटी २१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रेणुकाच्या या गाण्यात अंश जैन आणि प्रांजल दहिया एकत्र दिसणार आहेत. रेणुका आणि अक्की आर्यन यांनी गाण्याला आवाज दिला आहे. गाण्यातील प्रांजल आणि अंशची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. राजकेश मझरिया यांनी लिहिले आहे, तर संगीत उन जाजी यांनी दिले आहे.

रेणुका आणि प्रांजल दहिया या जोडीने हरियाणवी इंडस्ट्रीला अनेक जबरदस्त गाणी दिली आहेत. जेव्हा जेव्हा तिची कोणतीही गाणी प्रदर्शित होतात, तेव्हा प्रेक्षक त्याला पाहतात आणि लाखोंच्या पलीकडे व्ह्यूज पोहोचतात. रेणुकाच्या नवीन गाण्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

त्याचबरोबर रेणुका आणि सपना चौधरी (Sapna choudhary) ही हरियाणवी इंडस्ट्रीतील अशी दोन नावे आहेत ज्यांनी आपल्या गाण्यांनी सर्वत्र धमाल केली आहे. दोघीही अशा व्यक्ती आहेत की, ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. सपना आणि रेणुका जेव्हा गाण्यात एकत्र परफॉर्म करतात, तेव्हा खूप धमाल होते. त्यांचे ‘चटक मटक’ गाणे सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात सपनाचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. तर रेणुकाने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. त्यांचे ‘चटक मटक’ गाणे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाले होते.

रेणुकाने हरियाणवी इंडस्ट्रीला नवी ओळख दिली आहे. तिचे ‘५२ गज का दामन’ हे हरियाणवी इंडस्ट्रीतील पहिले गाणे आहे, जे १ अब्जाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. याशिवाय तिने ‘कबूतर’, ‘बीपी हाय’, ‘जाऊंगी पाणी लेन’, ‘काला दमन’, ‘परांदा’ अशी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा