Thursday, March 28, 2024

‘लेकर हम दीवाना दिल’, असे म्हणत आशा भाेसले यांनी थाटला 14 वर्षाचा संसार

हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले (asha bhosale) यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. आशा भोसले यांचे वडिल अभिनेता आणि शास्त्रीय गायक होते, त्यामुळे संगीताचा वारसा त्यांना घरातुनच मिळाला. मात्र, आशा अवघ्या 9 वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी कौटूंबाची जबाबदारी संभाळण्याकरिता तिन्हे लता मंगेशकर यांच्यासोबत चित्रपटात गाणे म्हणायला सुरुवात केली.

आशाने (Aasha Bhosle) पहिल्यांदा 1948 साली ‘चुनरिया’ या चित्रपटातील ‘सावन आया’ या गाण्याणे हिंदी संगीतसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर ‘परीणिता’ आणि ‘बूट पॉलिश’ या चित्रपटाच्या गाण्याणे आशाच्या आवाजाला ओळख मिळाली. मग यशाचे शिखर गाठताना आशाने कधी मागे वळून पाहिले नाही. करियर दरम्यान आशाची मुलाखत पंचम दा (RD Burman) सोबत झाली मग पुढे काय झाले चला जाणून घेऊया…

आशा भोसले यांची 1956 साली आरडी बर्मन सोबत भेट झाली. मुळात झाले असे की, पंचम दा ने ‘तीसरी मंजिल’ या चित्रपटाच्या गाण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला होता.आणि त्यावेळी आशाही पती गणपत यांच्या पासून दुरावली होती. आशा जेव्हा अवघ्या 16 वर्षाची होती तेव्हा तिन्हे 30 वर्षीय गणपत सोबत विवाह बंधनात अडकली होती. या लग्नाला तिच्या कौटुंबाचा आक्षेप असला तरी आशाने आपला निर्णय घेतला होता.परंतु हे नातं फार काळ टिकू शकले नाही लग्नानंतर काहि वर्षातच गणपत भोसले यांचे निधन झाले.

मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या पतीच्या निधनानंतर आशाच्या आयुष्यात ओपी नय्यर आले.नय्यर आणि आशा भोसले यांचे प्रेमसंबंध १९५८ ते १९७२ पर्यंत सुरू होते. ओपी नय्यर यांचे आशा भोसले यांच्यासोबतचे प्रेमसंबंध १४ वर्षे टिकले. त्यानंतर दोघेही वेगळे झाले.दुसरीकडे पंचम दाचे लग्नही तुटण्याच्या मार्गावर होते. त्यांचे आणि त्यांची पत्नी रीता पटेल यांच्यातही काही व्यवस्थित नव्हते. बुडती नैया को सहारा मिल गया अशाप्रकरे, आशा आणि पंचम दा यांना एकमेकांचा सहारा मिळाला.

आशा भोसले यांनी आरडी बर्मन यांच्या कंपोजिशनमध्ये ‘ओ हसीना जुल्फों वाली’, ‘आजा आजा’ यासारखी प्रचंड हिट गाणे गायली. त्यांनी रेखाच्या ‘उमराव जान’ या चित्रपटात अनेक गझल गायल्या, यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर ‘मेरा कुछ साम’ या गाण्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

आशा आणि पंचम दा यांची जोडी सुपरहिट ठरली. यानंतर वयाच्या ४७ व्या वर्षी आशाने पंचम दा यांच्याशी लग्न केले. पंचम दा त्यांच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान होते, त्यामुळे त्यांची आई या लग्नाच्या विरोधात होती. मात्र, त्यांना मनवल्यानंतर त्या तयार झाल्या आणि आरडी बर्मन यांनी आशा भोसले यांच्याशी लग्न केले. लग्नाला 14 वर्षे उलटून गेल्यानंतर पंचम दा यांचे निधन झाले पण त्यांच्या आठवणी आशा भोसले यांच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘मी काहीच विसरले नाही, मी अखेरची मुघल आहे…’, आशा भोसलेंच्या विधानाने वेधले सर्वांचे लक्ष
कंगना रणौतने केले शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे कौतुक; म्हणाली, ‘गॉड ऑफ सिनेमा’

हे देखील वाचा