Thursday, July 18, 2024

झहीरसोबत सोनाक्षी सिन्हा करणार रजिस्टर मॅरेज! संध्याकाळी असणार ग्रँड रिसेप्शन

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी तिचा प्रियकर झहीर इक्बालसोबत 23 जून रोजी मुंबईत लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, या बातम्यांना अभिनेत्रीने दुजोरा दिलेला नाही. आता एका नव्या रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, सोनाक्षी आणि झहीरचे रजिस्टर पद्धतीने लग्न होणार आहे. त्यानंतर, 23 जून रोजी संध्याकाळी रिसेप्शन पार्टी होणार आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

सोनाक्षी सिन्हाच्या एका मैत्रिणीने एका संवादात सांगितले की, “मला 23 जूनच्या संध्याकाळी या जोडप्यासोबत सेलिब्रेट करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. पण प्रत्यक्ष लग्नाचा कुठेही उल्लेख नाही. माझ्या माहितीप्रमाणे, त्यांनी रजिस्टर विवाह आधीच करून घेतला आहे किंवा ते २३ जूनच्या सकाळी करू शकतात. या दोघांचे कोणतेही थाटात लग्न होणार नाही, फक्त एक पार्टी होणार आहे.”

सध्या अभिनेत्रीच्या लग्नाशी संबंधित फारशी माहिती समोर आलेली नाही. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल तिच्या घरच्यांनाही माहिती नाही. अलीकडेच तिचे वडील, अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती नाही. ते म्हणाले, ‘मी मीडियामध्ये जेवढे वाचले आहे तेवढे मलाही माहीत आहे, सोनाक्षी याविषयी कधी सांगेल. मी आणि माझी पत्नी आशीर्वाद देण्यासाठी जाऊ. आम्ही त्यांना नेहमी आनंदाची शुभेच्छा देतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अशी पाहिजे कार्तिक आर्यनला बायको; हे गुण असणे महत्वाचे
‘पंचायत 3’ मध्ये ‘सचिव जी’ला मिळाली सर्वाधिक फी? अखेर जितेंद्र कुमार यांनी सोडले मौन

हे देखील वाचा