मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा दिलकश अंदाज! मोत्याच्या नथीवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा


मराठी सिनेमाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी, तिचे ग्लॅमरस लूकमधील एकामागून एक फोटो शेअर करतच असते. ‘हिरकणी’ फेम अभिनेत्री आपल्या स्टाईलिश अंदाजाने चाहत्यांची मने जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. स्टायलिश सोबतच तिचा पारंपारिक अंदाज देखील नेहमीच चाहत्यांना भावतो. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी सोनाली, सतत तिचे लेटेस्ट फोटोशूट आणि व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलद्वारे चाहत्यांसमोर सादर करत असते.

सोनालीने नुकतेच शेअर केलेले फोटो आता चाहत्यांना वेड लावत आहेत. हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पारंपारिक अंदाजात दिसली आहे. फोटोतील सोनालीच्या अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल! तुम्ही पाहू शकता की, यात तिने केशरी रंगाची साडी परिधान केली आहे. सोबतच तिने कपाळावर टिकली लावून, नाकात मोत्याची नथही घातली आहे. एकंदरीत या पारंपारिक लूकमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे.

सोनालीच्या या मनमोहक लूकला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तिचे चाहते फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करून, तिच्याप्रती त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतायेत. या फोटोंना अवघ्या २ तासांतच २५ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सोनालीच्या सौंदर्याचे भरभरून कौतुकही केलं जात आहे. तसेच लाल हार्ट ईमोजीचा पाऊस या फोटोवर पडलेला पाहायला मिळत आहे. (sonalee kulkarni’s latest tradition photoshoot see here)

सोनाली कुलकर्णीने आजवर अनेक चित्रपटात वाखण्याजोग्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक चित्रपटातील तिची अनोखी भूमिका नेहमीच रसिकांना भावते. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आगामी काळात ‘झिम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.