‘कोणत्याही गोष्टीसाठी मी माझे वर्कआऊट विसरू शकत नाही,’ म्हणत मराठमोळ्या सोनालीने केला वर्कआऊट व्हिडिओ शेअर


मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. आपल्या सौंदर्याने आणि नजरेच्या एका इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते. तिचा चाहतावर्ग देखील तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Sonalee kulkarni’s work out video viral on social media)

सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “मी माझे रखडलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त होते. पण कोणत्याही गोष्टीसाठी मी माझे वर्कआऊट कधीच विसरू शकत नाही. खूप दिवसांनी जिममध्ये आल्यावर मी सामर्थ्याने आणि उत्कटतेने वर्कआऊट करत आहे.”

या व्हिडिओमध्ये सोनाली खूप मन लावून वर्कआऊट करताना दिसत आहे. तिचे जिम ट्रेनर तिला ऑर्डर देताना ऐकू येत आहे. वर्कआऊट करताना तिने काळ्या रंगाचा टॉप आणि जांभळ्या रंगाची पॅंट परिधान केली आहे. तसेच स्पोर्ट्स शूज घातले आहेत. चाहते तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.

सोनालीने मे महिन्यात कुणाल बेनोडकर याच्याशी लग्न केले आहे. त्या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पाडला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने वटपौर्णिमेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लग्नानंतर सोनालीची ही पहिलीचं वटपौर्णिमा होती. त्यामुळे ती खूपच आनंदी आणि उत्सुक होती.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ठ डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.