प्रेग्नन्सीच्या अफवांमध्ये सोनम कपूर झाली एअरपोर्टवर स्पॉट; यावेळी पुन्हा दिसला तिच्या ‘फॅशनचा जलवा’


बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मागे नेहमी पॅपराजींची फौज तैनात असते. कलाकार कधी, कुठे, केव्हा जातात, काय खातात, काय घालतात, कसे चालतात, कसे बोलतात, कसे हसतात आदी सर्वच गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. वाचून अतिशयोक्ती वाटेल पण कटू असले तरी सत्य आहे. यात तर अभिनेत्रींचे इतक्या बारीक नजरेने निरीक्षण केले जाते की विचारायलाच नको. अभिनेत्रींना पॅपराजी, मीडिया नेहमी लग्नाबद्दल विचारतात तर लग्न झालेल्या अभिनेत्रींना त्यांच्या प्रेग्नन्सीबद्दल. अभिनेत्रींनी सैल कपडे घातले तर त्या प्रेग्नेंट असल्याचे शोध नेटकरी आणि मीडिया लावताना आपण नेहमीच बघतो.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही दिवसांपूर्वी भारतात आली. जवळपास एक वर्षांनी सोनम लंडनहून भारतात आली. तिला एअरपोर्टवर जेव्हा स्पॉट केले गेले, तेव्हा तिच्या कपड्यांवरून सोनम प्रेग्नेंट असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र सोनमने एका सोशल मीडिया पोस्टवरून या चर्चांना अप्रत्यक्षरीत्या पूर्णविराम दिला आहे. दीपिका, ऐश्वर्यानंतर सोनम कपूरदेखील प्रेग्नेंट असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या. (sonam kapoor was seen at airport)

photocourtesy: google/sonam kapoor

सोनमबद्दलच्या प्रेग्नन्सीच्या अफवांनंतर नुकतेच तिला पुन्हा एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. लंडनहून आल्यानंतर पुन्हा सोनम एअरपोर्टवर दिसली. यावेळी सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यात ती खूपच आकर्षक दिसत होती. काळ्या ड्रेसवर, गॉगल आणि मास्क घातलेल्या सोनमने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

photocourtesy: google Sonam-Kapoor

सोनमच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द जोया फॅक्टर’ सिनेमांनंतर ती पुन्हा चित्रपटांमध्ये दिसलीच नाही. मागच्या अनेक महिन्यांपासून ती तिच्या पतीसोबत आनंद आहुजासोबत लंडनमध्ये होती.

सोनमने तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवांना खोटे ठरवण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने एक बुमरॅंग व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती काहीतरी पिताना दिसत होती. यावेळी तिने लिहिले होते की, “माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसासाठी गरम पाण्याची बाटली आणि आल्याचा चहा,” हा व्हिडीओ शेअर करत सोनमने ती गर्भवती असल्याच्या चर्चांना अफवा ठरवले.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?

-सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.