युजरने सोनूकडे गर्लफ्रेंडसाठी मागितला आयफोन; मजेशीर प्रत्युत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘तिचं माहिती नाही…’


मागच्या वर्षी कोरोना नावाच्या महामारीने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि आपले संपूर्ण जीवन बदलून गेले. या महामारीने आपल्या आरोग्य सेवेचे तीन तेरा तर वाजवले. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. हॉस्पिटल्स, औषधं कमी पडू लागली. या आजारामुळे रुग्णांची संख्या खूपच वाढली. लॉकडाऊन झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. खाण्यापिण्याचे हाल झाले. या काळात देवदूत म्हणून धावून आला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. कोरोनामुळे निर्माण झालेल्या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी सोनूने लोकांना शक्य त्या प्रकारे मदत करायला सुरुवात केली. कोरोना कमी झाल्यानंतरही सोनूने त्याचे मदतकार्य बंद केले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नागरिकांच्या येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करत आहे.

त्याच्या या मदतीदरम्यान त्याला अनेक मजेशीर समस्यांवर देखील लोकांनी मदत मागितली. याचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. अशातच पुन्हा एकदा सोनूकडे अशीच एक मजेशीर मागणी करण्यात आली आहे.

सोनू सूद आणि त्याचे सूद फाउंडेशन यांना टॅग करत ‘इंजिनीअरिंग बॉय’ नावाच्या ट्विटर हँडलवरून सोनूला मेसेज करण्यात आला आहे की, ‘भाऊ माझी गर्लफ्रेंड आयफोन मागत आहे, त्याचे काही होऊ शकते का?’ हे ट्वीट वाचून प्रत्येकालाच हसायला येत होते. मात्र, यावर सोनू काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. काही वेळाने सोनू सूदनेही या युजरला मजेशीर उत्तर दिले.

सोनूने ट्वीट केले, ‘तिचं तर माहिती नाही, पण जर आयफोन दिलास तर तुझे काहीच शिल्लक राहणार नाही.’ सोबतच सोनूने स्माईली इमोजीही शेअर केले. सध्या सोनूचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सोनूने नुकतेच ‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्याच्या मुलाला एक गाडी भेट म्हणून दिल्याचे समोर आले आहे. सोनूने काळ्या रंगाची मिर्सिडीज मेबाच जीएलएस ६०० इशांतला भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे म्हटले जात आहे.

करोनावरील औषधांचा बेकायदेशीर पुरवठा केल्याप्रकरणी आमदार झिशान सिद्दिकी आणि अभिनेता सोनू सूद यांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर? खरं काय ते घ्या जाणून

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’


Leave A Reply

Your email address will not be published.