वाढदिवसाच्या अगोदर जॉन अब्राहमच्या सर्व सोशल मीडिया पोस्ट डिलीट, चाहते पडले गोंधळात

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या अभिनयासाठी आणि हॉटनेससाठी ओळखला जातो. तो सतत त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. मात्र अभिनेता आता एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला आहे. खरं तर जॉनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्व पोस्ट अचानक डिलीट करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, त्याचा प्रोफाईल पिक्चरही काढून टाकण्यात आला आहे.

अभिनेता जॉन अब्राहमच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून सर्व फोटो आणि व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. मात्र, जॉन अब्राहमने स्वत: त्याचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत की, त्याचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे जॉन अब्राहमचे इंस्टाग्रामवर बरेच चाहते आहेत. सोशल मीडियावर त्याला ९ दशलक्षाहून अधिक युजर्स फॉलो करतात. त्याच्या सर्व पोस्ट हटवल्यानंतर चाहते आता गोंधळात पडले आहेत. (john abraham deletes all posts from instagram account)

John-Abraham
Photo Courtesy: Instagram/thejohnabraham

अभिनेत्री आलिया भट्ट, क्रिती सेनन, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी जॉन अब्राहमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करतात.

वाढदिवसाच्या आधी झाल्या पोस्ट डिलीट
जॉन अब्राहमचा ३ दिवसांनी म्हणजेच, १७ डिसेंबरला वाढदिवस आहे. अशा स्थितीत त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अचानक सर्व पोस्ट डिलीट झाल्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचे अकाउंट हॅक झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र अद्याप त्याच्या बाजूने कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

तो अलीकडेच २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते २’ मध्ये दिसला होता. विशेष म्हणजे जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ हा चित्रपट रिलीझ होणार आहे. अशा स्थितीत ही प्रमोशनची रणनीती आहे की काय, असेही बोलले जात आहे. त्याचे अकाऊंट हॅक झाले आहे की नाही किंवा अभिनेत्याने स्वत: इंस्टाग्रामवरून त्याच्या सर्व पोस्ट हटवल्या आहेत की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

हेही वाचा :

Latest Post