Tuesday, June 18, 2024

दुःखद ! अभिनेत्री सोफिया लिओनचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन, अपार्टमेंटमध्ये सापडला मृतदेह

अडल्ट चित्रपट अभिनेत्री सोफिया लिओनी हिचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी ती तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. 26 वर्षीय अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अभिनेत्रीचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीचा मृत्यू कसा झाला याचा तपास सध्या सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांत अनेक अभिनेत्रींच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर यासंदर्भात नवीन वाद सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफिया गेल्या आठवड्यात तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय दिसली होती, जिथे तिने काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. सोफियाच्या सावत्र वडिलांनी तिच्या मृत्यूची पुष्टी केली, ते म्हणाले, “तिच्या आई आणि कुटुंबाच्या वतीने, मला आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी सांगायची आहे. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिचे कुटुंब आणि मित्र उद्ध्वस्त झाले आहेत. खूप मोठा धक्का बसला.”

ते म्हणाले, “सोफिया 1 मार्च रोजी तिच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. स्थानिक पोलिस सध्या मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत. गेल्या तीन महिन्यांतील हा चौथा अडल्ट स्टारचा मृत्यू आहे. याआधी कागनी लीचे वय अवघ्या 36 वर्षांची होती. ती 2015 मध्ये आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्याआधी जानेवारी महिन्यात जेसी जेन तिचा प्रियकर ब्रेट हसनमुलरसह ओक्लाहोमामध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राम चरणने घेतली स्वयंपाकघराची जबाबदारी, ‘या’ खास व्यक्तीसाठी बनविले जेवण
नितेश तिवारीच्या ‘रामायण’मधून विजय सेतुपतीचा पत्ता कट, ‘हा’ अभिनेता साकारणार विभीषणची भूमिका!

हे देखील वाचा