Saturday, April 20, 2024

बापरे बाप! साऊथच्या ‘या’ अभिनेत्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी उरुस, किंमत वाचून तुम्हीही व्हाल शॉक

सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जीवन किती आलिशान असतं हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याच्या कपड्यांपासून ते महागड्या गाड्यांपर्यंत सर्व गोष्टींबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. अशातच आता आणखी एका दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्याने महागडी गाडी खरेदी केली आहे. तो अभिनेता इतर कुणी नसून पृथ्वीराज सुकुमारन असे आहे. त्याच्या या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. एका फॅन अकाऊंटवरून अभिनेत्याच्या गाडीचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) याच्या महागड्या गाडीचे नाव लॅम्बोर्गिनी उरुस (Lamborghini Urus) असे आहे. त्याच्या या गाडीचे व्हायरल व्हिडिओ पाहून चाहतेही भलतेच खुश झाले आहेत. एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “पृथ्वीराज सुकुमारन याने आपल्या लॅम्बोर्गिनी हुरेकनच्या बदल्यात नवीन लॅम्बोर्गिनी उरुस गाडी खरेदी केली आहे.”

या व्हिडिओवर कमेंट करत एक चाहता म्हणाला की, “ही उरुस ग्रॅफाइटची कॅप्सूल एडिशन आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले. त्याने लिहिले की, “चार कोटींची गाडी.”  तसेच, एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करत आश्चर्यचकित होणारा इमोजीही वापरला.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पृथ्वीराज सुकुमारन याने लॅम्बोर्गिनीच्या बदल्यात घेतलेली उरूस गाडीचा मॉडेल LP 580-2 हा होता. केरळमधील नवीन लॅम्बोर्गिनी उरूसची किंमत ३.६ कोटी रुपये आहे. तसेच, लॅम्बोर्गिनी हुरेकनची किंमत ४.५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पृथ्वीराजकडे मिनी कूपर जेसीडब्ल्यू, टाटा सफारी आणि पॉश कॅन यांसारख्या गाड्या आहेत.

पृथ्वीराज सुकुमारन याने २००२मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच्या सिनेमाचे नाव ‘नंदनम’ होते. हा सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर हा अभिनेता अनेक सिनेमांमध्ये झळकला. तसेच, पृथ्वीराज सुकुमारन हा २ हिंदी सिनेमांमध्ये दिसला आहे. त्याने २०१९ मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले होते. त्याचा ‘लुसिफर’ हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी सिनेमा होता. त्याने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा