काय सांगता! राम चरणसोबत साऊथ कोरियाची ‘ही’ अभिनेत्री करणार रोमान्स?

South Superstar Ram Charan Now Next With Shankar To Have South Korean Actress Bae Suzy As The Leading Role Fans Happy


साऊथ सुपरस्टार राम चरणचे चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. रामने आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक भन्नाट चित्रपट दिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून घोषणा केली होती की, चित्रपट निर्माता एस शंकर यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी तो उत्साही आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे असे म्हटले जात आहे की, या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ कोरियन अभिनेेत्री त्याच्यासोबत झळकणार आहे.

चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करत त्याने लिहिले होते की, ‘शंकर सरांसोबत शानदार सिनेमा जगताचा भाग होऊन उत्साही आहे.” या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला होता.

माध्यमांतील वृत्तानुसार, हा चित्रपट क्रिएटिव्ह चित्रपटाच्या दृष्टीने भारतभर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शीर्षक (नाव) अद्याप निश्चित केलेले नाही. परंतु या चित्रपटात ऍक्शनचा जबरदस्त तडका असणार आहे. या चित्रपटाबाबत आणखी एक रंजक माहिती समोर येत आहे.

राम चरणसोबत ही अभिनेत्री करणार रोमान्स

माध्यमांतील वृत्तानुसार, राम चरण अभिनित एस शंकर दिग्दर्शित या चित्रपटात शंकर यांच्या या चित्रपटात साऊथ कोरियन अभिनेत्री बे सुझी दिसणार आहे. रामसोबत सुझी मोठ्या पडद्यावर रोमान्स करतानाही दिसणार आहे.

तरीही, बे सुझीबाबत राम चरणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सोबतच चित्रपट निर्मात्यांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. परंतु जेव्हापासून ही बातमी समोर आलीय, तेव्हापासून राम चरणच्या चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. विशेष म्हणजे, या बातमीनंतर राम आणि सुझीचे सोबतचे फोटोशॉप मीम्स बनत आहेत.

या चित्रपटात रश्मिका मंदानाही झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे निर्मातेे राजू गुरू आणि शिरीष गुरू आहेत. विशेष म्हणजे राम चरणचा हा १५ वा, तर राजू गुरू यांचा ५० वा चित्रपट आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात


Leave A Reply

Your email address will not be published.