×

World Water Day | ‘महाकवी’ नामदेव ढसाळ यांची ‘ती’ कविता वाचून अभिनेत्री स्पृहा जोशीने दिला खास संदेश

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी ही विविध गुणसंपन्न अभिनेत्री आहे. तिचे अनेक कलागुण ती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून आपल्याला तिच्यातील एक कवियत्री अनुभवायला आणि ऐकायला मिळत आहे. तिच्या अनेक नवनवीन कविता तसेच काही दिग्गज कवींच्या कविता ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करत असते. तिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि हावभाव देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. अशातच नुकतेच मंगळवारी ( २२ मार्च) रोजी जागतीक जलदिन साजरा झाला आहे. जलदिनाच्या पार्श्वभूमीवर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पाण्याचे महत्व सांगणार्या दोन कविता सादर केल्या आहेत.

ती सुरूवातीला नामदेव ढसाळ यांची आहे. या कवितेत पाण्याबाबत असणाऱ्या समस्या किंवा जर पाणी संपले तर मानवावर काय परिस्थिती ओढवू शकते याची सगळी हृदयद्रावक परिस्थिती या कवितेत मांडली आहे. तसेच स्पृहाने देखील ही कवीता खूप चांगल्या पद्धतीने सादर केली आहे. स्पृहाने दुसरी कविता ही तिचा मित्र आणि अभिनेता जितेंद्र जोशीची सादर केली आहे. जितेंद्र जोशी याने पाणी फाउंडेशनचा देखील काम केले आहे.

या निमित्ताने त्याने विदर्भात जाऊन तेथील पाहणी केली होती. त्यावेळी तेथील लोकांची जी काही परिस्थिती त्याने पाहिली त्याचे प्रतिबिंब म्हणजे ही कविता आहे. जी स्पृहाने सादर केली. या कवितेतून तिने पाणी टंचाईची परिस्थिती आणि यासाठी आपण काय केले पाहिजे याची माहिती दिली आहे, व्हिडिओचा शेवट ऐकताना नक्कीच सगळे भावुक व्हाल. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

स्पृहाने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

Latest Post