राडाच ना! जान्हवीने केले हॉट ड्रेसमधील फोटो शेअर, ४ तासांतच मिळाले ७ लाखांपेक्षा अधिक लाईक्स


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक अशा हिट चित्रपटात काम केले आहे. त्यांची मुलगी जान्हवी कपूरदेखील आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत आपले स्थान पक्के करत आहे. तिने खूप कमी काळात आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपला दीवाना बनवले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर तब्बल ११.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता तिने पुन्हा एकदा आपले हटके फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जान्हवीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत चाहत्यांना तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या फोटोत तिने स्कीन कलरचा हॉट ड्रेस परिधान केला आहे. (Sridevi Daughter Janhvi Kapoor Shared A Photo In A Glamorous Look Fans Liked The Look of The Actress)

या फोटोंमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या अंदाजातील आपल्या अदा दाखवत आहे. ती भिंतीजवळ उभीर राहून हटके पोझ देत आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

अभिनेत्रीच्या फोटोंना जबरदस्त पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांसोबतच बॉलिवूड कलाकारही तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहेत.

तिच्या या फोटोंवर पदार्पणासाठी सज्ज असलेली तिची चुलत बहीण शनाया कपूरने कमेंट करत फायर आणि स्मायलिंग फेसचे इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच शनायाची आई महीप कपूर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही कमेंट करत फायर आणि स्मायलिंग फेसचे इमोजी पोस्ट केले आहेत.

याव्यतिरिक्त तिच्या या फोटोंना अवघ्या ४ तासांच्या आतच ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ही संख्या सतत वाढतच आहे.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. ती लवकरच ‘गुड लक जॅरी’ या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार होता. पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. परंतु अजूनही त्याच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्याचे नाव समोर आले नाही. तसेच ती ‘तख्त’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या आधी ती शेवटची ‘रूही’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बोल्ड एँड ब्युटीफुल! बीचवरील रेतीने माखलेली दिसली दिशा पटानी; बिकिनीतील बोल्ड फोटोचा इंटरनेटवर बोलबाला

बापरे बाप! ‘लूई विटॉन’ ब्रँडच्या महागड्या ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर; किंमत वाचून होतील बत्त्या गुल

-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’


Leave A Reply

Your email address will not be published.