बहिणींचे अतुट नाते! खुशी कपूरने केला जान्हवीसोबतचा फोटो शेअर; तिनेही केली भलतीच मागणी


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीही आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकताना दिसत आहेत. जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेऊन आपले सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर मात्र लवकरच अभिनयात पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. या दोन्ही बहिणींमधील बाँडिंग जगजाहीर आहे. दोघीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्या एकमेकांचे फोटो शेअर करून एकमेकींवरील आपले प्रेम व्यक्त करतात. नुकतेच खुशीने सोशल मीडियावर जान्हवीसोबतचा एक फोटो शेअर करत तिची आठवण काढली. यावेळी कमेंट करत अभिनेत्रीनेही वेगळीच मागणी केली. तिची ही पोस्ट आणि कमेंट चाहत्यांना भलतीच भावली आहे. (Sridevi Daughter Khushi Kapoor Shares Pic With Sister Janhvi Kapoor Actress Says Come Here And Give Me Attention)

खुशीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर जान्हवीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत दोघीही समुद्र किनाऱ्यावर बनलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या दिसत आहेत. जान्हवीने मिश्र रंगाचा शर्ट घातला आहे, तर खुशी काळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. दोन्ही बहिणी खूपच सुंदर दिसत आहेत.

हा फोटो शेअर करून खुशीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “खूप प्रेम कधी कधी.” या पोस्टवर जान्हवीनेही लक्षवेधी कमेंट करत “ओह अप्रतिम… तू इथे येऊन मला अटेंशन देऊ शकते का?”

Photo Courtesy: Instagram/khushi05k

जान्हवीव्यतिरिक्त सिद्धांत कपूर, महीप कपूर, सोनम कपूर यांसोबतच अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत दोघींनाही सुंदर म्हटले आहे.

खुशी कपूरबद्दल बोलायचं झालं, तर जान्हवीप्रमाणे तिचेही बॉलिवूड पदार्पणाबद्दल अंदाज लावले जात आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, खुशी तेलुगु सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. तरीही याबाबत अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

जान्हवी कपूरबद्दल बोलायचं झालं, तर ती अने चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यामध्ये चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचाही समावेश आहे. यामध्ये दीपक डोबरियालसोबतच मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. याव्यतिरिक्त ती ‘तख्त’ आणि ‘दोस्ताना २’ चित्रपटातही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.