Tuesday, June 6, 2023

सनी लियोनीसोबत एका व्यक्तीने असे काही केले की, तिला त्याच्यावर उगारवी लागली चप्पल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नवनवीन फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ती नेहमीच प्रकाशझोतात येत असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे बोल्ड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. नुकताच सनीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने सनीसोबत असे काही केले ज्यामुळे ती त्या व्यक्तीकडून बदला घेताना दिसत आहे. एवढेच नाही तर तिने त्याच्यावर चप्पल देखील उगारली.

सनीने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात दिसते सनीचा एक मित्र तिला स्विमिंग पूलमध्ये धक्का देताना दिसत आहे. त्यानंतर सनी तिची चप्पल काढते आणि त्या मित्राला मारते. सनीच्या या फनी व्हिडिओला पाहून सर्वच नेटकरी जोरदार हसताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने बदला घेण्याबद्दल देखील लिहिले आहे. यानंतर सनीने अजून एक व्हिडिओ शेअर केला ज्यात ती पुलमधून बाहेर येताना दिसत आहे. एवढ्यातच तिचा मित्र येतो आणि तिला कसे आहे विचारतो. यावर सनी म्हणते, “मी काही म्हणू इच्छिते. पण काही लहान मुलं देखील हा व्हिडिओ बघतील म्हणून काही बोलत नाही. ते तुला माझा लूक आवडत आहे ना. माझी चप्पल पाण्यामुळे खूपच आवाज करत असून माझा बाथरोब जड झाला आहे.

सध्या सनी तिच्या अनेक प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नेहमीच ती तिच्या शूटिंग सेट्वरुन वेगवेगळे व्हिडिओ शेअर करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा