Thursday, April 18, 2024

‘रक्षा बंधन’ सिनेमातील ‘हे’ गाणे रिलीझ, बहिणीचे कन्यादान करताना अक्षय कुमार भावूक, पाहा Video

सुपरस्टार अक्षय कुमार हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. तो दरवर्षी ४ ते ५ सिनेमात काम करतो. त्याचे जवळपास सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतात. मात्र, २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी काही खास ठरत नाहीये. यावर्षी त्याचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र, दोन्ही सिनेमांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

अशात अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा आगामी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी (दि. २९ जून) निर्मात्यांनी सिनेमातील ‘तेरे साथ हूं मैं’ (Tere Saath Hoon Main) हे गाणे प्रदर्शित केले आहे. या इमोशनल गाण्यात बहीण- भावामधील मजबूत नाते दाखवण्यात आले आहे.

या गाण्याचा व्हिडिओ अक्षयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच, त्याने लिहिले आहे की, “भावंडं आयुष्यात कधीच एकटे जात नाहीत. कारण, त्यांचा हात धरणारा एक भाऊ किंवा बहीण त्यांच्यासोबत नेहमीच असतो. आमच्या या गाण्याने हा सुंदर नाते साजरे करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) 

या गाण्यापूर्वी निर्मात्यांनी अक्षय आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) अभिनित ‘रक्षा बंधन’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय आपले प्रेम आणि कौटुंबिक आयुष्यामध्ये संघर्ष करताना दिसत आहे. ट्रेलरवरून समजते की, या सिनेमाची कहाणी एक भाऊ आणि चार बहिणींच्या भोवती फिरते.

या ट्रेलरमध्ये अभिनेता आपल्या बहिणीचे लग्न करण्यासाठी मुलगा शोधताना दिसत आहे. मात्र, हुंड्यामुळे तो आपल्या बहिणीचे लग्न करण्यात अपयशी ठरतो. त्यामुळे त्याच्या प्रेमकहाणीवरही याचा परिणाम पडतो. या ट्रेलरमार्फत बहीण-भावाचे नाते दाखवले आहे.

बहीण- भावाच्या नात्यावर आधारित सिनेमा
हाती आलेल्या वृत्तानुसार, या सिनेमाची कहाणी बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असेल. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय हे करत आहेत. अक्षयसोबत या सिनेमात भूमी पेडणेकर दिसणार आहे, तीच या सिनेमातील त्याची प्रेमिका आहे. या सिनेमाची घोषणा अक्षयने २०२० मध्ये रक्षाबंधनच्या दिवशी केली होती. अक्षयने हा सिनेमा आपली बहीण अलका भाटिया हिला समर्पित केला आहे.

कधी होणार प्रदर्शित?
अक्षय कुमारचा हा सिनेमा यावर्षी ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आमिर खान याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाला टक्कर देताना दिसेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा