Friday, April 19, 2024

भयावह! ‘निरहुआ हिंदुस्थानी’च्या सेटवर घडायच्या ‘अशा’ घटना, की आम्रपाली दुबेने केला होता पळून जाण्याचा निर्णय

साल २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निरहुआ हिंदुस्तानी’ या चित्रपटाने भोजपुरी चित्रपटसृष्टीला आम्रपाली दुबे (Aamrapali Dubey) ही एक सशक्त अभिनेत्री दिली. टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रीने या चित्रपटाद्वारे भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आजच्या काळात आम्रपाली दुबे ही भोजपुरी सिनेमातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तसेच या चित्रपटात तिची दिनेश लाल यादव (Dinesh Lal Yadav) उर्फ ​​निरहुआसोबतची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती.

चित्रपटाच्या सेटवर घडायच्या विचित्र घटना
या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये नाचायला भाग पाडले असेल, पण शूटिंगदरम्यान सेटवर अशा घटना घडल्या होत्या, ज्यामुळे आम्रपाली दुबेने सेटवरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. स्वतः आम्रपालीने पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. अभिनेत्रीने सांगितले की, सेटपासून सुरू झालेल्या आठवणी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यासोबत राहतील. (superstar nirahua hindustani revealed about set accidents)

सेटवर व्हायचे भयानक अपघात
आम्रपाली दुबेने सांगितले की, सेटशी संबंधित तिच्या अनेक भयानक आठवणी आहेत. ती रोज सेटवर विचार करायची की आज काय होईल? आम्रपालीचा को-स्टार आणि सुपरस्टार निरहुआनेही याबद्दल सांगितले. तो म्हणाला, “शुटिंगच्या पहिल्याच दिवशी कॅमेरामनसोबत अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शूटिंग अर्धवटच थांबवावे लागले. त्यानंतर आम्हाला असे वाटले की, आम्ही पुढे शूट करू शकणार नाही.”

छत्तीसगडमध्ये झाली शूटिंगची सुरुवात
त्याने पुढे सांगितले की, “त्यानंतर आम्ही छत्तीसगडमध्ये चित्रपटाचा सेट बनवला आणि शूटिंगला सुरुवात केली. मात्र तेथे जनरेटरला आग लागली आणि तो जळू लागला.” निरहुआ पुढे म्हणाला, “या अपघातानंतर आम्रपाली दुबेने चित्रपट सोडून पळून जाण्याचा विचारही केला होता. आम्रपालीने तिच्या बहिणीसह तिची तिकीट काढली आणि चित्रपट सोडून पळून जाण्याची योजनाही आखली होती.”

टीमने मिळून घेतला ‘हा’ निर्णय
निरहुआ पुढे म्हणाला की, “त्यानंतर आम्ही एक मीटिंग बोलावली आणि शूटिंग संपेपर्यंत सेटवर झालेल्या अपघातांबद्दल कोणालाही सांगायचे नाही, असे ठरवले.” पुढे आम्रपाली दुबेने सांगितले की, तिने बहिणीसोबत सेटवरून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, कारण ती खूप घाबरली होती. निरहुआ म्हणाला, “सर्वांच्या मनात भीती असायची की, आज त्यांच्यासोबत काही होऊ नये. पण कसे तरी आम्ही शूटिंग पूर्ण केले आणि आमच्या मेहनतीचे फळ तुमच्यासमोर आहे.”

३० चित्रपटांमध्ये केलंय एकत्र काम
पहिल्याच चित्रपटापासून या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. भोजपुरी सिनेमात निरहुआ आणि आम्रपालीची जोडी खूप पसंत केली जाते. या दोघांनी ३० हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा