Tuesday, June 25, 2024

‘या’ दोन अभिनेत्रींसोबत सुपरस्टार निरहुआने रस्त्यावर लावले ठुमके, पाहून तुमचेही थिरकतील पाय

भोजपुरी सिनेमाचा ज्युबिली स्टार दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ (Dinesh Lal Yadav Nirahua) त्याच्या वेगळ्या आणि खास अंदाजासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाची स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. सध्या सोशल मीडियावर निरहुआचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये निरहुआ बिग बॉसच्या अक्षरा सिंग (Akshara Singh) आणि श्रुती राव (Shruti Rao) सोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ ‘सबका बाप अंगूठा छाप’ या चित्रपटाचे निर्माते प्रदीप के शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये निरहुआ पिवळ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या जीन्स आणि लाल रंगाच्या शूजमध्ये खूपच स्मार्ट दिसत आहे. त्याच्या हातात अक्षरा आणि श्रुती राव आहेत आणि तो त्यांच्यासोबत जोमात डान्स करत आहे. श्रुती राव लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे, तर अक्षरा काळ्या रंगाच्या पोशाखात खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

हा व्हिडिओ निरहुआ, अक्षरा, श्रुती अभिनित ‘सबका बाप अंगूठा छाप’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे तिन्ही कलाकार चित्रपटाच्या एका डान्स नंबरसाठी रिहर्सल करत होते, तेव्हा चित्रपट निर्माते प्रदीप के शर्मा यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. आता त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रदीप के शर्मा यांच्या या चित्रपटाचे निर्माते अनिता शर्मा आणि पद्मा सिंग सहनिर्माते आहेत. दिनेश लाल यादव त्याच्या आगामी ‘सबका बाप अंगूठा छाप’ या चित्रपटाचे प्रयागराजमध्ये शूटिंग करत आहेत. बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात दिनेश लाल यादव निरहुआ, अक्षरा सिंग, श्रुती राव, संजय पांडे, संजय महानंद, पद्मा सिंग आणि इतर अनेक कलाकार आहेत. पराग पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझे अक्सा बीच घूमा दूं’ गाण्यावर अनुपमा आणि अनुजने रस्त्यावर केला धमाकेदार डान्स

-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

-अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा