Latest Posts

भोजपुरी सुपरस्टारच्या चाहत्याने हात कापून लिहिले त्याचे नाव; गर्दी पाहून वाढवली अभिनेत्याच्या घराची सुरक्षा


आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते किती वेडे असतात, याचा प्रत्यय आपल्याला अनेकवेळा आला आहे. यामध्ये असेही काही चाहते असतात, जे आपल्या लाडक्या अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी कोणत्याही थराला जातात. असेच काहीसे भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग याच्याबाबत पाहायला मिळाले आहे. तो चाहत्यांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे. त्याला भेटण्यासाठी चाहते शेकडो किलोमीटर दूरवरून भेटण्यासाठी येतात, तर काहीजण त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या छातीवर अभिनेत्याचे टॅटू बनवतात. त्याला एकदा भेटण्यासाठी चाहते काहीही करण्यासाठी तयार असतात. नुकतेच एका चाहत्याने असे काही, केले जे सर्वांच्या भुवया उंचावणारे होते. (Superstar Pawan Singh Fan Cut His Hand And Wrote Pawan Name Security Increased At House)

खरं तर पवन सिंगच्या एका चाहत्याने अभिनेत्यावरील प्रेम दाखवण्यासाठी आपला हात कापला आणि त्याला भेटण्यासाठी दिल्लीवरून आरापर्यंत पोहोचला. पवनला जेव्हा याबाबत समजले, तेव्हा तोदेखील हैराण झाला. त्यानेही अशाप्रकारची कोणतीही अपेक्षा केली नव्हती. पवन सिंगने त्या मुलाची भेट घेतली आणि त्याला म्हटले की, “कृपया असे जोखीमीचे काम करू नको.”

पवनने यापूर्वीही सांगितले आहे की, त्याच्या चाहत्यांनी असे कोणतेही काम करू नये, जेणेकरून कोणताही त्रास होईल. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या प्रेमापोटी आपला जीव धोक्यात घालू नये. पवन म्हणाला की, “जर तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करता, तर तुम्ही असं काहीही करू नका, जेणेकरून तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. तसेच माझ्या मनालाही त्रास होईल. मी तुमच्या प्रेमाचा आणि मायेचा श्रणी आहे. त्यामुळे मला तुमची काळजी वाटते. मला तुमचा असाच आशीर्वाद हवा आहे.”

या सर्वांमध्ये बिहार सरकार आणि स्थानिक प्रशासनाने पवन सिंगच्या आरा येथील घराची सुरक्षा वाढवली आहे. नेहमीच पवन सिंगच्या घराच्या जवळ चाहत्यांची मोठी गर्दी होत असते. पवन सिंग कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या आरा येथील घरीच आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर पवनच्या घराबाहेर ४०० ते ५०० चाहते घराबाहेर जमलेले असतात. हे पाहून आता जिल्हा प्रशासनाने पवन सिंगच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा!’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो

-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss