Tuesday, May 14, 2024

थलैवाची तब्येत खालावली!! सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात केले दाखल

सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत अचानक खालावली आहे. रजनीकांत यांना अचानक रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने तातडीने हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

रजनीकांत हे त्यांच्या अन्नाथे या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. मात्र, चित्रपटाच्या काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने चित्रीकरण थांबवलं गेलं होतं. रजनीकांत यांनी चित्रीकरण थांबल्यामुळे त्यांच्या हैद्राबाद येथील फार्महाऊसमध्ये स्वतःला कॉरंटाईन करून घेतलं होतं.

अपोलो रुग्णालयाकडून रजनीकांत यांच्या तब्येतीवर अधिकृत वक्तव्य केलं आहे. त्यानुसार रजनीकांत यांच्यामध्ये कोव्हीड १९ ची कोणतीच लक्षणं आढळली नाही आहेत. त्यांच्या रक्तदाबामध्ये फक्त कमालीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

Rajnikant
Rajnikant

आमच्या उत्तमोत्तम डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीवर बारकाईने नजर ठेवून आहे. तब्येतीत सुधार झाल्यास त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटा अन्नाथेचं चित्रीकरण हे यावर्षाच्या सुरुवातीलाच सुरू होणार होतं परंतु कोरून महामारीमुळे लॉकडाऊन झालं आणि चित्रपटाचं चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं होतं. देशात पुन्हा एकदा सगळीकडे अनलॉक होत असताना चित्रपटांच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली. यामुळेच गेल्या १४ डिसेंबरपासून हैद्राबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये पुन्हा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

परंतु, या चित्रपटाच्या टीममधील तब्बल सहा सदस्य हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चित्रपटाचं चित्रीकरण पुन्हा एकदा थांबलं. याच कारणामुळे रजनीकांत यांनी स्वतःला त्यांच्या हैदराबाद येथील फार्महाऊसवर सेल्फ कॉरंटाईन करून घेतलं होतं. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा आणि कीर्ती सुरेश या दोन सुप्रसिद्ध अभीनेत्री देखील झळकणार आहेत.

शिवाय येत्या ३१ डिसेंबर रोजी थलाईवा त्यांच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. यामुळे फक्त त्यांच्या चाहत्यांच्याच नाही तर संपूर्ण राजकीय व्यक्तींच्या नजरा त्यांच्या प्रकृतीकडे लागल्या आहेत. शिवाय त्यांचे चाहते त्यांना देवासमान प्रेम करतात हे तर आपल्याला ठाऊक आहेच. त्यामुळे रजनीकांत हे लवकरच बरे होऊन आपल्याला चित्रीकरण करताना दिसतील यात काही शंका नाही.

हे देखील वाचा