Friday, March 29, 2024

चाहत्यांचा वेडेपणा! चित्रपटाच्या पोस्टरवर बकरीचे रक्त शिंपडल्याने भडकले रजनीकांत

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूड आणि जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारे अभिनेते म्हणजे ‘थलायवा’ रजनीकांत होय. रजनीकांत सध्या आपल्या ‘अन्नाथे’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. अशामध्येच रजनीकांत आपल्या चाहत्यांवर भडकले आहेत. तसेच चाहत्यांनी केलेल्या कृत्यांना वाईट म्हटले आहे.

खरं तर, रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी बकरीचे रक्त शिंपडल्यामुळे अभिनेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओ काय सांगतो?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित व्हिडिओत रजनीकांत यांचे चाहते म्हणवणाऱ्या काही लोकांनी एका बकरीला मारले आणि तिचे रक्त चित्रपटाच्या पोस्टरवर शिंपडले आहे. चाहत्यांच्या या क्रूर घटनेमुळे रजनीकांत खूपच नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी याचा निषेधही केला आहे.

पहिल्यांदाच घडली अशी घटना
आतापर्यंत रजनीकांत यांचे चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्यांच्या पोस्टरवर दूध टाकताना दिसले होते, ज्याला दक्षिण भारतात ‘पलाभिषेकम’ असे म्हटले जाते. हे नेहमी देवासाठी मंदिरात केले जाते. चाहते रजनीकांत यांना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील देव मानतात. मात्र, अशात चाहत्यांनी आता बकरीचे रक्त शिंपडल्याच्या घटनेने त्यांचे हृदय तोडले आहे. अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे.

रजनीकांत यांचे जवळचे मानले जाणारे व्ही एम सुधाकर यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, “हे केवळ खेदजनकच नाही, तर निंदनीय घटना आहे.” त्यांनी चाहत्यांना विनंती केली आहे की, अशाप्रकारच्या कोणत्याही घटनेचा भाग होऊ नका.

दिवाळीला प्रदर्शित होणार ‘अन्नाथे’
रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिवा यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांत यांचा शेवटचा चित्रपट
रजनीकांत यांनी आतापर्यंत ‘रोबोट’, ‘२.०’, ‘काला’, ‘दरबार’, ‘चंद्रमुखी’, ‘कबाली’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत हे शेवटचे ‘दरबार’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी पोलिसांची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

हे देखील वाचा