आपल्या सुमधूर आवाजाने संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिकांमध्ये नेहा कक्कर हिचा समावेश होतो. नेहाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. असे असले, तरीही ती तिच्या गाण्यांमुळे अनेकदा ट्रोल होत असते. मात्र, तिच्या फॅन फॉलोविंगवर याचा कोणताही फरक पडत नाही. चाहत्यांसोबतच मोठमोठे कलाकारही तिच्या आवाजाचे चाहते आहेत. याचा पुरावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून लावला जाऊ शकतो. या व्हिडिओत सुपरस्टार राम चरण हा नेहा कक्करचा चाहता असल्याचे म्हणत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
राम चरण आणि नेहा कक्कर व्हिडिओ
फक्त साऊथमध्येच नाही, तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा राम चरण (Ram Charan) त्याच्या साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असतो. अशात त्याचा आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खरं तर, या व्हिडिओत राम चरण एका इव्हेंटमध्ये बसल्याचे दिसत आहे. तेवढ्यात नेहा कक्कर त्याला भेटण्यासाठी येते, ज्यावर राम चरण हात जोडून, मान झुकवून स्मितहास्य देत उभा होतो. तसेच, तो नेहाला म्हणतो की, “मी तुझ्या कामाचा खूप मोठा चाहता आहे.” यावर नेहा हसत म्हणते की, “ओह माय गॉड! हे ऐकून चांगले वाटले. मी पण तुमची फॅन आहे.”
View this post on Instagram
राम चरण ट्रोल
राम चरणकडून नेहा कक्करची प्रशंसा ऐकून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरं तर, या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट्स करत अभिनेत्याच्या साधेपणाची आणि नेहाच्या आवाजाची प्रशंसा करत आहेत. मात्र, काहींनी त्याला जोरदार ट्रोल केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “व्यंगात्मक बोलत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “खोटं का बोलत आहे राम चरण?” आणखी एकाने लिहिले की, “राम चरण हा एक कॉमेडियन आहे हे मला माहितीच नव्हते.” एकाने असेही म्हटले की, “साऊथवालेही खोटं बोलतात?”
खरं तर, अभिनेता राम चरण याने नुकतेच वडील बनण्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. यानंतर त्याच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. दुसरीकडे, नेहा कक्करबद्दल बोलायचं झालं, तर ती तिच्या ‘मैंने पायल हैं छनकाई’ या गाण्यामुळे भलतीच ट्रोल झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! महेश मांजरेकरांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल, माढा कोर्टाने दिले चौकशीचे आदेश
लय भारी! ‘पावनखिंड’मधील ‘या’ अभिनेत्याने बांधली लगीनगाठ, जोडप्याचे फोटो जोरदार व्हायरल