Thursday, July 18, 2024

सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे संजू बाबाने घेतला मोठा निर्णय; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘अंधश्रद्धा मानतो का?’

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या कामाने इतका मोठा पल्ला गाठलाय की, आता त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. या कलाकारांमध्ये समावेश होतो अभिनेता संजय दत्त याचा. संजय दत्त हा दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा आहे. त्याने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्याचे अधिकतर सिनेमे हे सपशेल आपटलेत. विशेष म्हणजे, आपले नशीब सुधारण्यासाठी त्याने आपल्या लकी नंबरचा निरोप घेतला आहे आणि नंबर प्लेटही बदलली आहे.

सिनेमे फ्लॉप झाल्याने संजय दत्तने बदलली गाडीची नंबर प्लेट!
अनेक वर्षांपासून अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याचा आवडता नंबर 4545 हा राहिलाय, ज्याची एकूण बेरीज ९ येते. हाच नंबर संजयने त्याच्या सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटला ठेवला आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, त्याला 4545 हा नंबर आवडतो. संजय याने आता त्याच्या गाडीचा नंबर बदलला आहे. त्यामुळे त्याच्या नवीन गाडीचा नंबर हा 4545 हा नसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

लकी नंबरला ठोकला रामराम
संजय दत्त याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, संजयचा ज्योतिष आणि अंकशास्त्रावर खूप विश्वास आहे. त्याला 4545 हा नंबर ठेवण्यासही ज्योतिषानेच सांगितले होते. सूत्रांनी असेही सांगितले की, आता संजय दत्तच्या ज्योतिषाने त्याला हा सल्ला दिला आहे की, त्याने आपला ‘4545’ हा नंबर बदलला पाहिजे आणि त्याचा नवीन नंबर ‘2999’ हा असला पाहिजे. त्याला सांगण्यात आले आहे की, असे केल्याने त्याला व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारे मदत मिळेल. सूत्रांनी असेही सांगितले आहे की, संजय दत्त याने नवीन मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) ही गाडी बूक केली आहे. तसेच, त्याने कंपनीला विनंती केली आहे की, गाडीच्या नंबर प्लेटवर 2999 हा नंबर असला पाहिजे.

संजय दत्त याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने यावर्षी ३ सिनेमात काम केले आहे. त्यात ‘केजीएफ २’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘शमशेरा’ यांचा समावेश आहे. यातील फक्त ‘केजीएफ 2’ या सिनेमाने एक हजार कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. इतर दोन सिनेमांना बजेटइतकीही कमाई करता आली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदित्य रॉय कपूरला डेट करतेय क्रिती सेनन? करण जोहरनेही सांगून टाकलं, ‘मी तुम्हाला कोपऱ्यात…’
सर्वोच्च न्यायालयाकडून अमिषा पटेलला मोठा दिलासा, कोट्यवधींच्या फसवणुकीचा होता आरोप
सोनालीला न्याय मिळावा म्हणून लढतेय तिची लेक; म्हणाली, ‘मुख्यमंत्र्यांनी विश्वास देऊनही सीबीआय तपास नाहीच’

हे देखील वाचा