दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजताना दिसतोय. बिग बॉसच्या घरात या सीझनमध्ये अनेक दिग्गज कलाकार आलेलेत. त्यांच्यासोबत काही इन्फ्ल्यून्सरस सुद्धा सीझनमध्ये सहभागी झालेलेत. त्यातल्याच, सध्या ‘गुलिगत धोका’ म्हणजेच सुरज चव्हाणची (Suraj Chavhan) चांगलीच चर्चा रंगताना दिसतीये.
बिग बॉस मराठीत सुरज चव्हाण याने इंट्री घेऊन अनेकांना आश्चर्यचकित केले. अनेकांनी त्याला त्याच्या या निर्णयावर ट्रॉल सुद्धा केले गेले. घरात गेल्यानंतर सुरज काही दिवस एकदम शांत दिसून आला. त्याला एवढ्या लोकांसोबत घरात जमवून घेणे अवघड असल्याचे दिसून येत होते. त्याप्रमाणे , त्याला बिग बॉस चा गेम कळला नाही असेही अनेकांनी ऐकवले. मात्र सुरज ने स्वतःवर मेहनत केली. व त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली. भाऊच्या धक्क्यावर सुद्धा रितेश देशमुख ने सुरज चव्हाण याचे कौतुक केले.
त्याच्या याच प्रयत्नांनी , आता घरातील सदस्यांचे आपल्याबद्दलचे मत बदलण्यास त्याने भाग पाडले आहे.
कलर्स मराठी कडून एक प्रोमो शेअर करण्यात आला , त्यात असे दिसून येते की , सुरज गार्डन एरियात कचरा काढताना दिसत आहे. त्यावर अंकिता व घराची पहिली कॅप्टन म्हणते की, “सुरजला असं बघून मला कसतरी वाटतंय”. त्यावर समोर बसलेले पॅडी दादा म्हणतात, ” बिचारा , बाहेर देखील हेच काम करत असेल. तो मला काल म्हणाला की दादा तुम्ही खाली झोपता मी वर झोपतो… मला खूप वाईट वाटतं.” त्याच्यावर अंकिता म्हणते की ‘सूरजला गेम नाही कळला पण त्याला माणसं नक्की कळली.’
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेला सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात चांगलाच गाजताना दिसून येतोय. त्याची निरागसता व त्याचे शुद्ध मन यामुळे सुरज घरातल्या सदस्यांचे व प्रेक्षकांचे सुद्धा मन जिंकताना दिसून येतोय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
‘पान मसाला’ची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर जॉन अब्राहम संतापला, केला मृत्यू विकल्याचा आरोप
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहेत साऊथचे हे चित्रपट! जाणून घ्या यादी…