जेव्हा रजनीकांत यांना पहिल्यांदा भेटला होता सुशांत सिंग राजपूत; ‘अशी’ होती ‘थलायवा’ची रिऍक्शन


बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन उद्या म्हणजेच 14 जूनला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील लोकांना अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. त्याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उभे राहिले होते. यावर सीबीआयने देखील तपासणी केली होती. सुशांत एक खुल्या विचारांचा व्यक्ती होता. तो कोणत्याही व्यक्तीशी बोलला, तरीही त्याच्याशी खूप आदर सन्मानाने बोलत असायचा. तो कोणालाही भेटल्यावर त्याला आदर्श मनात असे. कोणीही लगेच त्याचा चाहता बनेल, असाच होता तो. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य आजही सर्वांच्या आठवणीत आहे.

सगळेजण सुशांतची आठवण काढत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. याच दरम्यान त्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत सिंग राजपूत, महेंद्र सिंग धोनी आणि रजनीकांत दिसत आहेत. रजनीकांत यांच्याशी भेट झाल्यावर सुशांत खूपच खुश दिसत आहे. सुशांत हा रजनीकांत यांचा खूप मोठा चाहता होता.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एमएस धोनी या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या चित्रपटात सुशांतने धोनीचे पात्र निभावले होते. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित केला होता. यावेळेस महेंद्र सिंग धोनी रजनीकांत यांना भेटायला गेला होता, तेव्हा त्याच्यासोबत सुशांत देखील चेन्नईला गेला होता.

या व्हिडिओमध्ये स्वतः धोनी त्याच्या चित्रपटाबाबत सांगत आहे. जेव्हा रजनीकांत विचारतात की, त्याचे पात्र या चित्रपटात कोण निभावणार आहे, तेव्हा तो सुशांतकडे इशारा करतो. त्यावेळी रजनीकांत यांनी हसत सुशांत सिंगची माफी मागितली की, त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती की, तोच धोनीचे पात्र निभावणार आहे.

जेव्हा रजनीकांत यांनी सुशांतकडे पाहिले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. सुशांतने त्याच्या शेवटचा ‘दिल बेचारा’ या चित्रपटात राजकुमार ज्युनिअरचे पात्र निभावले होते. सुशांत हा रजनीकांत यांचा खूप मोठा चाहता आहे. तसेच तो त्यांना आदर्श मानतो.

‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा सुशांत सिंगच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. या चित्रपटाने त्याला खूप ओळख दिली. या चित्रपटानंतर त्याला अनेक चित्रपटाच्या ऑफर मिळाल्या. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, कियारा आडवाणी आणि अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुसता राडा! पवन सिंगच्या ‘पुदिना ए हसीना’ गाण्यावर शिवानी सिंगचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

-‘काय रे जब्या, जिच्यासाठी तू काळी चिमणी…’, शालूच्या डान्स व्हिडिओवर युजरची भन्नाट कमेंट होतेय व्हायरल

-गुलाबी साडीत ‘जलेबी बाई’ बनून थिरकली आलिया भट्ट, डान्स व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.