Friday, December 8, 2023

बापरे..! अभिनेत्री सुष्मिता सेनने कुणाला मारली मिठी? युझर्स म्हणतायेत ‘ललित मोदीचा पत्ता कट’ – व्हिडिओ

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अशातच काही महिन्यांपूर्वी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना ती डेट करत असल्याचे फोटो आणि माहिती माध्यमांतून समोर आली. तसेच ललित मोदी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुष्मिता सेनसोबत असलेले नाते जाहीर केले होते. तसेच त्यांनी काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्या पोस्टनंतर अनेकांना धक्का बसला. मात्र आता एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ पाहूनही अनेक जण शॉक झालेत.
सुष्मिता सेन हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुष्मिता सेन ही एका व्यक्तीची गळा भेट घेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी थेट, ‘सुष्मिता सेन ललित मोदीला धोका देत असल्याचे’ म्हटले आहे. मात्र, हा व्हिडीओ आर्या 3 चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे सांगितले जात आहे. ( sushmita sen hugs sikandar kher watch video )
सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून आर्या 3 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यक्त होती. शेवटी आता नुकताच सुष्मिता सेन हिने आर्या 3 चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सेटवर धमाल करण्यात आली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुष्मिता सेन ही को स्टार सिकंदर खेर याची गळाभेट घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेन हिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट करत आहेत. सुष्मिता सेन आणि सिकंदर खेर यांच्या भेटीचा व्हिडिओ पाहून चाहते फिरकी घेतायेत. एकाने तर व्हिडिओवर कमेंट करताना म्हटले की, ‘सुष्मिता सेन ललित मोदी यांना धोखा देताना दिसत आहे.’

हे देखील वाचा