फिटनेस असावा तर असा! सुझेन खानचा फिटनेस आणि पुशअप्स पाहून तुम्हीही व्हाल चकित; पाहा व्हिडिओ


सुझेन खान म्हणजे बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची घटस्फोटित पत्नी. सुझेन खान जरी अभिनेत्री नसली, तरी तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सुझेनने अभिनयात जरी पदार्पण केले नसले, तरी ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. तिने अनेक मोठ्या कलाकारांच्या घरांचे आणि ऑफिसचे इंटेरियर देखील केले आहे. सुझेनने ऋतिक रोशनच्या बायको व्यतिरिक्त देखील तिची एक वेगळी ओळख तयार केली आहे. सुझेन खान दोन मुलांची आई आहे, मात्र तरीही ती अतिशय फिट आहे. सुजैन नेहमी तिचे व्यायाम करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील सुझेन चर्चेत येणाचे कारण हेच आहे.

नुकताच तिने जिममधला तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओत तिचा फिटनेस पाहून नेटकरी पुरते वेडे झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर फॅन्सकडून भरभरून कमेंटस आणि लाईक्स येत आहेत.

तसे तर सुझेन इंटेरियर डिझायनर आहे. मात्र, ती तिचा फिटनेस कटाक्षाने पाळते. नियमित व्यायाम आणि योगाच तिला फिट ठेवण्यात मदत करतात. तिचे हे फिटनेस व्हिडिओ सर्वानाच खूप आवडतात फॅन्ससोबतच अनेक कलाकार देखील तिच्या या व्हिडिओंना रिप्लाय देत असतात.

तिने नुकताच पोस्ट केलेला वर्कआउटचा व्हिडिओ पाहून सर्वच जणं तोंडात बोटं घालत आहेत. तिच्या या व्हिडिओवर मलायका अरोरा, सुझेनची बहीण फराह खान अली यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. तिचा हा पुशअप्सचा व्हिडिओ पाहून अनेक लोकांना प्रेरणा मिळत आहे. तिचा या व्हिडिओला खूपच कमी वेळात हजारो लाईक्स आले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-बॉलिवूडमध्ये आणखी एका सिक्वलची भर! दिशा पटानीने केली ‘या’ सिनेमाची घोषणा, पुढच्यावर्षी होणार प्रदर्शित
-‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेयर करत दिला सर्वांना सुखद धक्का
-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.