Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड लग्नानंतर तापसीने पहिल्यांदा पतीचा फोटो केला शेअर, ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवताना दिसला मॅथियास

लग्नानंतर तापसीने पहिल्यांदा पतीचा फोटो केला शेअर, ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवताना दिसला मॅथियास

भारतीय अभिनेत्री तापसी पन्नु (Tapasee pannu) हिने मध्ये मैथियास बोए याच्याशी २०२४ मध्ये लग्न केले. मैथियास बोए हा बैडमिंटन पटू आहे तो भारतीतील सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय खेळाडूंना कोचिंग देतो. विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकणारे सत्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी २०२४ पॅरिस ओलंपिकमध्ये पुरुष युगल स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करतील. लग्नानंतर पहिल्यांदाच तापसी पन्नुने आपल्या पतीचा फोटो शेअर केला आणि त्या फोटो सोबत एक नोट शेअर केली आहे.

तापसीने इंस्टाग्राम स्टोरीवर पति मैथियास बो याचा फोटो शेअर केला आहे.पॅरिस ओलंपिक २०२४ मध्ये काढलेल्या या फोटोत मैथियास बो हा भारतीय ग्रुपसोबत हातात तिरंगा घेऊन उभा आहे.त्यावर तिने कोणी विचार केला होता माझा डेनमार्क (नेशनल फ्लैग) घेऊन भारतासोबत उभा आहे.

तापसी पन्नु आणि मैथियास बो यांनी 22 मार्च, 2024 ला उदयपुर मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोज् आणि वीडियोज् सोशल मिडियावर खूप वायरलं झाले.पुढे जाऊन एका इंटरव्यू तिला गुपचूप लग्न केल्याबद्दल विचारण्यात आलं होत.तेव्हा ती म्हणाली,”मी काही गुपचूप लग्ना वगरे केलं नाही माझ्या लग्नात माझा पुर्ण परीवार सहभागी झाला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तापसी पन्नु आपल्या पतीला सपोर्ट करण्यासाठी पॅरिला जाणार आहे. अभिनेत्रीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तिने, आता जर तो आपल्या देशाच्या टिमचा कोच आहे तर सात्विक आणि चिराग हे ओलंपिक मध्ये पदक आणण्यासाठी चांगले दावेदार ठरतील.मी या कार्यक्रमात भाग घेऊन त्यांचा उत्साह वाढू इच्छिते.सोबतच माझा वाढदिवस आसपास असल्याने माझं ओलंपिकला हजर राहण्याच एक चागलं कारण आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आदित्य धरच्या मेगा प्रोजेक्टमध्ये दिग्दर्शकाचा फोटो पाहून खूश झाली कंगना; म्हणाली, ‘हे आहेत खरे स्टार..’
‘तारक मेहता ..’ मधून आणखी एका कलाकाराची एक्सीट ! कलाकार झाले भावुक

हे देखील वाचा