जुना टप्पू अन् जुनी सोनू करतायत एकमेकांना डेट? निधी म्हणाली, ‘तो इतका जवळ आला…’


लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सोनूची भूमिका साकारून, निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) घरोघरी प्रसिद्ध झाली आहे. निधी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि ती तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या चाहत्यांना सतत तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक देत असते. शोमधील टप्पूसोबत सोनूची चांगली मैत्री दाखवली आहे. अशावरून त्यांच्या डेटिंगच्या बातम्याही मीडियामध्ये जोर धरून असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने भव्य गांधीला (Bhavya Gandhi) डेट केल्याच्या वृत्तावर आपले मौन सोडले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, निधी भानुशालीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सह-कलाकार भव्य गांधीसोबत डेटिंगच्या बातम्यांबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “आमच्यात संवादाचे अंतर आहे. पण मला त्याच्या इतक्या जवळ येण्याची आणि त्याच्याशी मैत्री करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.” (Taarak mehta ka ooltah chashmah sonu nidhi bhanushali on dating with tappu bhavya gandhi)

जेव्हा निधीला टप्पूची भूमिका करणारा राज अनादकट आणि बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्यातील अफेअरबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने उत्तर दिले की, “मला या सगळ्यात अडकवू नका, मला याबद्दल काहीही माहिती नाही. कोणाच्या भुवया उंचावतील असे मला काहीही बोलायचे नाही.”

पुढे निधीने असेही सांगितले की, ती सध्या तिचा ट्रॅव्हल पार्टनर ऋषी याला डेट करत आहे. तिला आणि ऋषी दोघांनाही प्रवास करायला आवडते आणि ते सतत त्यांच्या कारमध्ये त्यांच्या पाळीव कुत्र्यासह एकत्र प्रवास करताना दिसतात. ऋषीसोबतच्या तिच्या लेटेस्ट रोड ट्रिपबद्दल बोलताना निधीने सांगितले की, त्यांनी एकत्र महाराष्ट्र, लडाख आणि नंतर जम्मू आणि काश्मीरच्या आसपासच्या अनेक भागांना भेट दिली. या प्रवासादरम्यान दोघेही अनेकदा तंबूत राहिले. व्हायरल झालेल्या सुट्टीतील तिच्या बिकिनी फोटोंबद्दल बोलताना निधी म्हणते की, तिच्या पालकांनी पाठिंबा दिल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल ती कृतज्ञ आहे. दुसरीकडे, ट्रोल्सबाबत ती म्हणाली की, अंधाऱ्या खोलीत कम्प्युटरच्या मागे बसलेल्या लोकांची तिला पर्वा नाही.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!