‘आई आहे होपलेस चिअरलीडर, तर बॉयफ्रेंडला समजत नाही ऑनस्क्रीन भावना…’, मुलाखतीत तापसी पन्नूने केला खुलासा


बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही तिचा ‘हसीना दिलरूबा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून खूप चर्चेत आहे. तिने तिच्या अनेक मुलाखतीमध्ये चित्रपटातील मस्ती, सीन्स, कलाकार याबाबत माहिती दिली आहे. आता तिने एका मुलाखतीत तिची आई आणि बॉयफ्रेंडबाबत सांगितले आहे. तिने सांगितले की, तिची आई एक होपलेस चिअरलीडर आहे आणि तिचा बॉयफ्रेंड माथीयास बो तिने ऑनस्क्रीन निभावलेल्या भावनांना समजू शकत नाही. (Tapsee pannu’s boyfriend mathias boe does not understand her on screen emotions)

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत तापसीला जेव्हा तिच्या आईच्या आणि बॉयफ्रेंडच्या आवडत्या चित्रपटांबाबत विचारले तेव्हा तिने सांगितले की, “माझी आई एक होपलेस चिअरलीडर आहे. तिला माझे सगळे चित्रपट आवडतात. माझ्या बॉयफ्रेंडला हिंदी चित्रपट समजत नाहीत. पण त्याने माझे सगळे चित्रपट पाहिले आहेत. परंतु त्याला त्यातील भावना समजत नाहीत. ज्या भावना मी ऑनस्क्रीन दाखवते त्याला त्या समजत नाहीत.”

तिने हे देखील सांगितले की, तिचा आगामी चित्रपट ‘शाबास मिठू’मुळे ती खूपच टेन्शनमध्ये आहे. तिने सांगितले की, “मी तुम्हाला सांगू शकते की, मी कोणत्या गोष्टीमुळे स्ट्रेसमध्ये आहे. मी ‘शाबास मिठू’ या चित्रपटासाठी खूप टेन्शनमध्ये आहे. कारण मी या चित्रपटात पाण्याच्या बाहेर असणाऱ्या माशाप्रमाणे आहे. मी या चित्रपटाआधी कधीच क्रिकेट खेळले नाही. मी या चित्रपटात नीट क्रिकेट खेळू शकेल की नाही, या गोष्टीमुळे खूप टेन्शनमध्ये आहे. क्रिकेट हा आपल्या देशात एक धर्म आहे.”

तापसी पन्नूने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिचे स्थान प्रस्थापित केले आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. तिचा ‘हसीना दिलरुबा’ हा चित्रपट २ जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तापसी पन्नू यासोबतच ‘लक्ष्मी रॉकेट’, ‘दोबारा’, ‘लूप लपेटा’ आणि ‘शाबास मिठू’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी देखील तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘उडण्यासाठी पंखांची गरजच काय?’, म्हणत ऋतुजा बागवे कडून ग्लॅमरस फोटो शेअर

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत वाजवलाय तिच्या अभिनयाचा डंका; वाचा तिचा जीवनप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.