‘अंतिम’ चित्रपटातील ‘कोई तो आएगा’ गाण्याचा टिझर रिलीझ; पाहायला मिळाला ‘भाईजान’चा दमदार अवतार


‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं अपने आप की भी नहीं सुनता!’, हा डायलॉग ऐकला नसेल, असा कदाचित एकही चाहता आपल्याला शोधूनही सापडणार नाही. हा डायलॉग म्हणणाऱ्या अभिनेत्याला तर कुणीही विसरणार नाही. तो अभिनेता म्हणजेच सलमान खान होय. सलमानने आजवर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तो सध्या आपल्या आगामी ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटातील ‘कोई तो आएगा’ या गाण्याचा टिझर प्रदर्शित केला आहे. या मध्ये सलमान खान एका वेगळ्याच मोडमध्ये दिसत आहे.

ऍक्शन अवतारात दिसला सलमान खान
आतापर्यंत चित्रपटाचा ट्रेलर आणि इतर गोष्टींतून हे समजत होते की, सलमान ऍक्शन सीन्ससोबतच शांतही दिसेल. मात्र, ‘कोई तो आएगा’ या चित्रपटात त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. सलमान या गाण्यात हाडे तोडताना आणि डोके फोडताना दिसत आहे. (Teaser of The New Song Koi To Aayega From The Film Antim Was Released Salman Khan Action Avatar Was Shown)

सलमानने हा टिझर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला ९४ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १० हजारांपेक्षाही अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज
या चित्रपटाची घोषणा होऊन बराच काळ लोटला असून प्रेक्षक आणि चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर काय पाहायला मिळेल, याचा पुरावा या गाण्याचा टिझर आहे. रवी बसरूर यांनी या गाण्याला संगीत दिले असून रवी बसरूर आणि शब्बीर अहमद यांनी गीत लिहिले आहे. तसेच, पार्श्वगायन रवी बसरूर आणि त्यांच्या टीमने केले आहे. सलमान आणि आयुष शर्मा अभिनित चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. चित्रपटाचे निर्मातेही त्यांच्या प्रमोशनबाबत जागरूक आहेत.

हा चित्रपट सलमान खान फिल्म्स बॅनरखाली बनलेला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर निभावत आहेत. यामध्ये अभिनेता आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे, तर सलमान खान द्वितीय मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच अभिनेता वरुण धवनही एका डान्स नंबरमध्ये झळकला आहे. या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मासोबत जिसू सेनगुप्ता, प्रज्ञा जैसल आणि महिमा मकवानासारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक दिसत आहेत

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे

-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’


Latest Post

error: Content is protected !!