मल्याळम अभिनेता मोहनलाल यांचा आगामी ‘आराट्टू’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर रिलीझ केला आहे. 54 सेकंदाच्या या टीझरमध्ये दमदार अॅक्शन सीन आणि सुंदर संगीत दोन्हीही पाहायला मिळत आहे. निर्मात्यांनी चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत, मोहनलाल यांचे सर्वोत्कृष्ट शॉट्स यात वापरले आहेत जे खरोखरच प्रभावी दिसत आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये मोहनलाल नेहमीप्रमाणेच स्टाइलिश दिसत आहेत. यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, हा चित्रपट चाहत्यांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट असेल.
‘आराट्टू’ चित्रपट बी उन्नीकृष्णन यांनी दिग्दर्शित केले आहे, तर चित्रपटाची पटकथा उदयकृष्ण यांनी लिहिली आहे. यापूर्वीही उदयकृष्ण यांनी ‘पुलीमुरुगन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. या चित्रपटाला ‘ऑल राऊंडर एंटरटेनमेंट’ म्हणून संबोधले जात आहे, ज्यात अॅक्शन, इमोशन्स आणि कॉमेडी यांचे परिपूर्ण संयोजन असेल.
या चित्रपटात दक्षिण स्टार श्रद्धा श्रीनाथने आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. याशिवाय विजयराघवन, साईकुमार, सिद्दीक, जॉनी अँटनी, नंदू, कोट्टायम रमेश, इंद्रन, शिवाजी गुरुवायूर, कोचूप्रेमन, प्रशांत अलेक्झांडर, अश्विन, लुकमान, रविकुमार, गरुड रामकुमार, गरुड रामगुप्त इत्यादी कलाकारांनी चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.
टेक्निकल टीमबद्दल बोलायचे झाले, तर विजय उलागानाथ यांनी सिनेमॅटोग्राफी केले असून, शमर मुहम्मद याचा संपादक आहे. तसेच राहुल राजने चित्रपटात संगीत दिले आहे. या चित्रपटाचे अॅक्शन सीन्स अनिल आरसू, के रवी वर्मा, ए विजय आणि सुप्रीम सुंदर यांनी दिग्दर्शित केले आहेत.
अभिनेता मोहनलाल नुकताच शुट सुरू झालेल्या ‘बारोझ’ चित्रपटाद्वारे, दिग्दर्शनातही हात आजमवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘बारोझ’ हा थ्रीडी फॅन्टेसी चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाची कथा वास्को द गामाचा खजिनदार ‘बॅरोस’च्या कथेवर आधारित आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, हा चित्रपट सुमारे 400 वर्ष जुन्या कथेवर आधारित आहे, जो दिग्दर्शक जिजो पुन्नो यांनी लिहिलेला आहे. सुरुवातीला तेच ‘बारोझ’ दिग्दर्शित करणारा होते, पण नंतर मोहनलाल यांनी स्वत: याचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.