‘एक चुटकी की कीमत…’, म्हणत एका चुटकीतच बदलला तेजस्विनी पंडितचा लूक; एकदा पाहाच


तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. करमणूक उद्योगातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे इंटरनेटवर बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात.

तेजस्विनीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. प्रथम जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा ती अतिशय साध्या लूकमध्ये असते. तेव्हा तिने मेकअप न करता जम्पसूट घातलेला पाहायला मिळत आहे. तेव्हा ती चुटकी वाजवते, तर क्षणातच तिचा लूक बदलतो आणि ती स्टायलिश अवतारात दिसते. यावरून असे लक्षात येते की, साधे असो वा ग्लॅमरस तेजस्विनी प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

हा व्हिडिओ शेअर करत तेजस्विनी म्हणतेय की, “एक चुटकी की कीमत तुम क्या जानो.” व्हिडिओला काही तासातच ५५ हजाराहून अधिक जणांनी पाहिले आहे. तसेच, कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देत चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. फोटोसोबतच कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. (tejaswini pandit shared her most stylish video on social media)

तेजस्विनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने केदार शिंदे दिग्दर्शित ‘अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एका वास्तविक कथेवर आधारित, मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने तिला बरीच ओळख मिळवून दिली. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयाचे धडे घेतानाचा अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल; रडण्यासाठी वापरली होती ‘ही’ पद्धत

-जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्र प्रेक्षकांसाठी घेऊन आली खास मल्याळम गाणं

-‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची


Leave A Reply

Your email address will not be published.