Sunday, June 8, 2025
Home अन्य बाबो! बिग बॉसमध्ये सौंदर्या शर्मा आणि शालीन भनोट सोबत घडला लज्जास्पद किस्सा

बाबो! बिग बॉसमध्ये सौंदर्या शर्मा आणि शालीन भनोट सोबत घडला लज्जास्पद किस्सा

सध्या सर्वत्र ‘बिग बस16‘ च्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये खूपच ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. कधी मीत्र शत्रू बनत आहेत तर शत्रू मित्र बनताना दिसून येत आहेत. सोमवार (दि, 6 डिसेंबर) रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये अविस्मरणीय घटना दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे शालीन भनोट खूपच लज्जास्पद झाला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये 100 पेक्षाही जास्त कॅमेरे आहेत ज्यामुळे कोणताही स्पर्धक कुठेही असला तरी त्याची कोणतीही चुकी त्याला खूपच माहागात पडू शकते. असंच काही सौंदर्या शर्मा आणि शालिन सोबत घडले आहे.

सोमवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये खूपच वाद आणि काही धमाकेदार गोष्टी पाहायला मिळाल्या. झाले असे की, सौंदर्या शर्मा (Saundarya Sharma) बाथरुममध्ये अंघोळ करण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आतमधून दरवाजा बंद केला नव्हता. त्यामध्येच शालीन भनोटने दरवाजा खोलला ज्यामुळे सौंदर्या जोरात ओरडली आणि शालिनला म्हणाली की, ‘नॉक करुन का आला नाही?’ मात्र,शालिन तिथेच गार पडला आणि हे सगळे होत असताना शालिनच्या पायाखालची जमीनच हादरली.

सौंदर्याचा आवाज ऐकल्यानंतर शालीन थोडा टेंशनमध्ये येतो तो म्हणतो की, “मला नाही माहीत की, सौंदर्या आतमध्ये आहे. मी मुद्दामून असे केले नाही.” मात्र सौंदर्याने या घटनेला जास्त रोस्ट न करता तिथेच सांभाळून घेतले. या घटनेचा फायदा शिव ठाकरे (Shiv Thakare) याने चांगलाच घेतला असून त्याने सौंदर्याची टिंगलही उडवली की, ‘तु दरवाजाची कडीच का लावली नाही.’ मात्र, सौंदर्या शिवच्या गोष्टींना हण्यामध्येच सोडून देते, आणि गाष्टीचा मुद्दा बनतो की, नाही हे पुढच्या भागमध्ये  पाहाणे खूपच महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-

अंगूरी भाभीचे पुन्हा एकाद होतंय आगमन, ‘या’ कार्यक्रमामध्ये साकारणार मुख्य भूमिका
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ झालं पोरकं, ‘या’ अभिनेत्यानेही कार्यक्रमाला केले अलविदा

हे देखील वाचा