Sunday, May 19, 2024

अंगूरी भाभीचे पुन्हा एकाद होतंय आगमन, ‘या’ कार्यक्रमामध्ये साकारणार मुख्य भूमिका

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘भाभी जी घर पर है‘ फेम ‘अंगूरी भाभी’ म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने या कार्यक्रमामुळे अमाप प्रसिद्धी मिळवली. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कामी वेळात मोठे स्थान निर्माण केले आहे. आजही तिने निभवलेल्या पात्राचे कौतुक केले जाते. या कार्यक्रमानंतर तिने ‘बिग बॉस‘ मध्येही चांगलीच धमाल केली होती. काही दिवसांपूर्वीच तिने डान्स रियालीटी शोमध्येही भाग घेतला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्री नवीन कार्यक्रमाद्वारे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पादर्पण करत आहे.

अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) नुकतंच मोठ्या ब्रेकनंतर टेलिव्हिजनवर परतणार आहे. त्यामुळे अंगूरी भाभीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शिल्पा सब टीव्हीवरील ‘मैडम सर‘ या कॉमेडी कार्यक्रमामध्ये वेगळ्याच पोलिसाच्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार असेही म्हटले जात आहे की, शिल्पा भिनेत्री गुल्की जोशी (Gulki Joshi) हिची जागा घेणार आहे. मात्र, याविषयी अजून काही माहिती समोर आली नाही. हा कार्यक्रम लखनऊमधील चार महिला पोलिस अधिऱ्यांवर अवलंबून आहे.

नुकतंच शिल्पाने एका मुलाखतीदरम्याण सांगितले की, “माझी भूमिका पोलिस अधिकाऱ्याची आहे. पण तिने आपली नौकरी सोडली आहे. ती सध्या तिच्या लग्नावर लक्ष केंदित करत असून आपल्या स्वप्नांना थंड पिटाऱ्यात टाकले आहे, ज्यामुळे तिचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. आता ती अनेक वर्षानंतर आपल्या ड्युटीवर परतली आहे. कार्यक्रमाचा टायटल खूप आकर्षक आहे आणि मला ते स्वत:शी जोडलेलं वाटत आहे. माझ्या घरातील सगळ्यच व्यकतींनी मला ‘बॉस’ आणि ‘सर’ म्हणत बोलायला सुरुवात केली आहे, कारण त्यांनी मला बाहेर काम करताना पाहिले आहे.”

 

View this post on Instagram

 

शिल्पा ‘झलक दिखला जा‘ 10 व्या सिजनमध्ये स्पर्धकाच्या रुपात पाहिले गेले मात्र, लवकरच ती या शोमधून बाहेर गेली. यानंतर तिने कार्यक्रमामधील अनुभव सांगत म्हणाली की, “त्या तीन मिनिटाच्या अणुभवासाठी एक कलाकार काय करतो, काय तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता का? तुम्ही रुबीना दिलैक (Rubina Dilaik) हिचा व्हिडिओ पाहा. तिला काहीही होऊ शकले असते. त्याच्यासाठी संचालक जबाहदार राहणार आहेत का? नंतर कैंडल मार्च काढण्याचा काहीच फायदा नाही. कोणत्याही व्यक्तीची इज्जत जिवंत असतानाच करा मेल्यानंतर ओरडू नका.”

अभिनेत्रीला झलक दिखला जा या कार्यक्रमामधून फार चांगला अनुभ आला नाही असे दिसून येत. मात्र, तिच्या आगमनामुळे चाहते खूपच खुश झाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ झालं पोरकं, ‘या’ अभिनेत्यानेही कार्यक्रमाला केले अलविदा
‘वेड्यात काढलं जातंय…’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे अक्षय कुमारला जितेंद्र अव्हाड यांचा टोला

हे देखील वाचा